'बाबा मला वाचवा..' हल्लेखारोंच्या तावडीतून मुलाला वाचवायला गेले; मुलासमोरच वडिलांवर झाडली गोळी

Crime News : आपल्या पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या एका वडिलांचा मुलाच्या डोळ्यादेखत हल्लेखोरांनी हत्या केली आहे. 10 वीत शिकणाऱ्या आपल्या मुलाला काही मुले मारहाण करत असल्याची माहिती वडिलांना मिळाली. मात्र आपल्या मुलाला वादातून सोडवत असताना गुंडांनी त्यांच्या छातीत गोळी झाडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 08:06 PM • 18 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

'बाबा मला वाचवा..' हल्लेखारोंच्या तावडीतून मुलाला वाचवायला गेले

point

मुलासमोरच वडिलांवर झाडली गोळी

Crime News : आपल्या पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या एका वडिलांचा मुलाच्या डोळ्यादेखत हल्लेखोरांनी हत्या केली आहे. 10 वीत शिकणाऱ्या आपल्या मुलाला काही मुले मारहाण करत असल्याची माहिती वडिलांना मिळाली. मात्र आपल्या मुलाला वादातून सोडवत असताना गुंडांनी त्यांच्या छातीत गोळी झाडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. दिल्लीतील ही घटना आहे. मोहम्मद उमरदीन असं 35 वर्षीय मृच वडिलांचं नाव आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : घराजवळ शौचास बसला होता, घरमालकाने गच्चीवरुन फेकून मारली फरशी, तरुणाचा मृत्यू; मृतदेह रस्त्यावर ठेऊन नागरिकांनी केला रास्ता रोको

'बाबा मला वाचवा'

उमरदीन यांचा 15 वर्षांचा मुलगा तहजीम मंगळवारी संध्याकाळी ट्यूशनवरून घरी परतत होता. वाटेत त्याने पाहिले की काही मुले त्याच्या मित्रांना मारहाण करत आहेत. त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्या मुलांनी तहजीमलाही पकडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या तहजीमने तातडीने वडिलांना फोन करून 'बाबा मला वाचवा' अशी विनवणी केली. मुलाचा आक्रोश ऐकून उमरदीन आपल्या पत्नीसह तातडीने घटनास्थळी पोहोचले.

छातीवर गोळी झाडून हत्या

उमरदीन तिथे पोहोचले तेव्हा हल्लेखोर अधिकच संतप्त झाले. आरोपींपैकी एकाने पिस्तूल काढून आधी हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर थेट उमरदीन यांच्या छातीवर गोळी झाडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उमरदीन यांना तातडीने गुरु तेग बहादूर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून उमरदीन यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, चार मुली आणि मुलगा तहजीम असा परिवार आहे.

हे ही वाचा : प्रेयसीने धोका दिला अन् प्रियकराने 'असा' बदला घेतला! रात्रीच्या अंधारात तरुणीच्या घरात शिरला अन्...

तपास अजूनही सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही संशयितांची ओळख पटली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तैनात केली आहेत. किरकोळ भांडणातून एका व्यक्तीची अशा प्रकारे हत्या झाल्याने दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
 

    follow whatsapp