Maharashtra Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींची ठाकरेंवर बोचरी टीका
देशात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीमध्ये सभा होणार आहे. अशाच इतर अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचा.
ADVERTISEMENT
Marathi Live News Updates : मशाल प्रचार गीतामधील 'जय भवानी' शब्द हटवण्याच्या आदेशाबाबत फेरविचार करण्यासाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला अर्ज केला होता. निवडणूक आयोगाने हा अर्ज फेटाळला असल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 06:34 PM • 27 Apr 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ठाकरेंवर बोचरी टीका
काँग्रेसचे राम मंदिराच निमंत्रण स्विकारलं नाही. जी लोक सनातनच्या विनाशाची भाषा करतात त्यांना इंडी आघाडीचे लोक महाराष्ट्रात बोलावून त्यांचा सन्मान करतात. हे दृष्य पाहून बाळासाहेबांना किती दु:ख झाले असेल, त्यांच्या मनाला किती वेदना झाल्या असतील.
इंडिया आघाडी वोट बँकेच्या राजकारणावर इतकी खालच्या थराला गेली आहे की, शिवाजी महाराजांच्या धरतीवर हे औरंगजेबांना मानणाऱ्यांशी मिळाले आहेत. नकली शिवसेना यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालली आहे.
आज बाळासाहेब असते तर यांच्या भूमिकेचे त्यांना फार दु:ख झाले असते. आज त्यांची जिकडेही आत्मा असेल, त्यांना ठाकरेंच्या या कारनाम्याने दु:ख झाले असते.
- 06:10 PM • 27 Apr 2024
''येडं पेरलं अन् खुळं उगवलं'', CM शिंदेंनी उडवली राहुल गांधींची खिल्ली
काँग्रेसच कसं चाललंय.. येड्याची जत्रा आणि पेढ्याचा पाऊस, पडू द्या त्यांचा पाऊस,पण मोदींकडे नुसते आश्वासनाचे पेढे नाहीत तर गँरंटी आहे. येडं पेरलं अन् खुळं उगवलं, अशी राहुल गांधींची अवस्था आहे. म्हणून त्यांच्या नादाला खुळ पण लागत नाही.
- 05:21 PM • 27 Apr 2024
उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम लोकसभा लढवणार
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून महायुतीने आता त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम उत्तर मध्य मुंबईतून लोकसभा लढवणार आहेत. दोनच दिवसापूर्वीच काँग्रेसने उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे वर्षा गायकवाड विरूद्ध उज्ज्वल निकम अशी लढत होणार आहे.
- 04:51 PM • 27 Apr 2024
शांतिगिरी महाराज 38 कोटींचे मालक
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरला आहे.शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र दाखल केले, त्यातून त्यांची संपत्ती समोर आली आहे, त्यांच्याकडे 9 गाड्या आहेत. मठ आणि गुरुकुल आहेत. एकूण 38 कोटींचे ते मालक आहेत.
- 03:02 PM • 27 Apr 2024
'उद्धव ठाकरेंच्या बोगीत फक्त..', फडणवीसांची विरोधकांवर टीका!
'राहुल गांधीच्या इंजिनमधील बोगीमध्ये सोनिया गांधी, प्रियांका गांधी बसू शकतात. शरद पवार यांच्या बोगीमध्ये सुप्रिया सुळे बसू शकतात आणि उद्धव ठाकरेंच्या बोगीत फक्त आदित्य ठाकरेच बसू शकतात. तिथे सर्वसामान्यांना प्रवेश नाही.' असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.
- 02:34 PM • 27 Apr 2024
काँग्रेस नेते नसीम खान यांची पक्षावर नाराजी, वर्षा गायकवाड घेणार भेट?
काँग्रेस नेते नसीम खान यांनी महाविकास आघाडीने राज्यातील लोकसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवार न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते नसीम खान म्हणाले की, काँग्रेस एकही मुस्लिम उमेदवार उभा करू शकली नाही हे अत्यंत चिंताजनक आहे. आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड भेट घेणार असल्याची माहिती आहे.
- 01:30 PM • 27 Apr 2024
'आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही', अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका
भोर तालुक्यातील एका सभेत बोलताना अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही,
- 01:11 PM • 27 Apr 2024
’तारक मेहता’ मध्ये रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारे गुरुचरण सिंह बेपत्ता
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील ‘रोशन सिंह सोढी’ची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंह गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता आहे. गुरुचरण सिंह हा बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. तर, सोढी यांनी चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने एक पोस्टही केली होती.
- 12:11 PM • 27 Apr 2024
धैर्यशील मोहिते पाटलांसाठी शरद पवारांची साताऱ्यात सभा
माढा लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा होत आहे. या सभेसाठी शरद पवार साताऱ्यात मान तालुक्यातील दहिवडीमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, प्रभाकर देशमुख या सभेला उपस्थित आहेत. दहिवडी येथील बाजार पटांगणावर होत असलेल्या सभेसाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
- 11:02 AM • 27 Apr 2024
कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात मोदींनी तंबू ठोकला- संजय राऊत
कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात मोदींनी तंबू ठोकला आहे असं म्हणत संजय राऊतांनी मोदींवर निशाणा साधला.
लवकरच मुंबईत सभा घेणार आहेत, छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल.
शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिले जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही
भाजपने त्या ठिकाणी उमेदवार जाहीर करणंच चुकीच आहे
छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्याव ही आमची भूमिका होती,कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती तरी छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ती जागा सोडली,आणि भाजप,नरेंद्र मोदी हे छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्रातली जनता हे कधीच विसरणार नाही
गादी पुढे मोदी कोणी नाही
कोल्हापूरची गादी,म्हणजे मोदींची गोदी नाहीभाजपा त्या गादीचा अपमान करत आहे
आम्हाला अपेक्षित होतं,मोदी छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रात येतात,जय भवानी जय शिवाजी ही घोषणा त्या गादीची आहे शिवाजी महाराजांचा सन्मान ती प्रेरणादायी घोषणा आम्ही देतो, महाराष्ट्राची ती कुलदैवत आहे त्यावर तुम्ही आघात करत आहात, शिवाजी महाराजांच्या गादीच्या विरोधात तुम्ही प्रचाराला आला आहात, जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आमची प्रचाराची घोषणा नाही,
तुमचा संबंध काय? जय शिवाजी जय भवानीऑन कांदा निर्यात
दोन हजार मेट्रिक टन गुजरातचा कांदा मंबईच्या नावासेवा पोर्ट वरून परदेशात जाणार
गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि ठेकेदारांना मालामाल करायचा डाव आहे, महाराष्ट्राचा कांदा सडवला जातोय तिथे तुम्ही निर्यात बंदी केली,
महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक, दूध उत्पादकांना चार पैसे मिळतात असं कळल्यावर निर्यात बंदी करतागुजरातचा पांढरा कांदा मोदींना प्रिय आणि महाराष्ट्रातला कांदा हा रस्त्यावर फेका महाराष्ट्रातला कांदा सडवा शेतकऱ्यांची अडवणूक करा हे मोदींचे धोरण आहे
शरद पवारांनी उदाहरण दिलं आहे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मुलांसाठी गुजरात मधल्या अमोल चारा पाठविला म्हणून नरेंद्र मोदींनी गुजरातच्या अमोल संचालकांवर गुन्हा दाखल करून खटले दाखल केले हा मोदींचा द्वेष
इथला शेतकरी तडफडत मेला पाहिजे, गुजरातचा शेतकरी जगला पाहिजे अशी मोदींची भूमिका आहेत ते गुजरातचे प्रधानमंत्री आहेत
ऑन मुख्यमंत्री शेतकरी
महाराष्ट्रातल्या साडेआठ कोटी शेतकऱ्यांना या शेतकऱ्याच्या मुलाप्रमाणे जमीन द्या आणि शेतात उतरण्यासाठी पाच पाच हेलिकॉप्टर द्या,असे माझे देवेंद्र फडणवीस यांना आवाहन आहे
ऑन जाहीरनामा
त्यांच्या जाहीरनाम्याचा तसा काही उपयोग नाही अजित पवार किंवा शिंदे गटाचा यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही
शिर्डीत विमानातून वेगळ्या प्रकारचे सामान आलं अस तेथील लोक सांगत आहेत,त्यांची भिस्त ही पैशांवर आहे मतांवर नाही त्यामुळे जाहीरनामा करून त्यांना काय करायचं आहे
त्यांना टीका करू द्या आधी लिहायला वाचायला शिका, त्यांना जाहीरनामा कळतो का?
- 10:50 AM • 27 Apr 2024
शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावं, अशी आमची इच्छा होती – संजय राऊत
शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावं, अशी आमची इच्छा होती. शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी कोल्हापुरात येत आहेत. गुजरातचा कांदा मुंबईतील बंदरातून परदेशात जाणार. भाजपकडून गादीचा अपमान केला जातोय असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
- 09:47 AM • 27 Apr 2024
रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेला आक्षेप फेटाळला
महायुतीच्या रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेला आक्षेप फेटाळला. रावेर लोकसभेच्या महायुतीच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर 26 एप्रिल रोजी एका अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात लेखी अर्ज देऊन आक्षेप घेतला. परंतु आक्षेप घेताना पुरावे सादर न केल्याने सदर आक्षेप फेटाळण्यात येत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्णय दिला आहे.
- 09:02 AM • 27 Apr 2024
पुण्यात शिवसंग्राम संघटनेची आज महत्वाची बैठक
पुण्यात शिवसंग्राम संघटनेची आज महत्वाची बैठक आहे. ज्योती मेटे भूमिका जाहीर करणार. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी की महायुतीला पाठींबा देणार? या संदर्भात घोषणा करणार . सकाळी 11 वाजता सुरु होणार बैठक. दुपारी दीड वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार.
- 09:00 AM • 27 Apr 2024
तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी PM मोदी आज महाराष्ट्रात
तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात. संध्याकाळी पाच वाजता कोल्हापूरमध्ये मोदींची जाहीर सभा. कोल्हापूर नंतर मोदी गोव्यातही जाहीर सभा घेणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गुजरात दौऱ्यावर. वडोदरा, भरूच, गोधरामध्ये अमित शाह यांचे रोडशो आणि जाहीर सभा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT