Exclusive Mallikarjun Kharge: अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका लढणार? खरगेंचं मोठं विधान

ADVERTISEMENT

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
social share
google news

Mallikarjun Kharge on Amethi-Raebareli Exclusive Interview: नवी दिल्ली: देशात एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) घेण्यात येणार आहेत. ज्यापैकी दोन टप्पे हे पूर्ण झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशातही लोकसभेच्या एकूण 80 जागांपैकी 16 जागांवर मतदान पार पडलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये अजूनही 64 जागांवर मतदान बाकी आहे. यापैकी रायबरेली आणि अमेठी लोकसभा जागा असून त्याबाबत प्रचंड सस्पेन्सचे वातावरण आहे. (will rahul gandhi priyanka gandhi fight from amethi raebareli congress president mallikarjun kharge important statement regarding this in a exclusive interview with news tak)

गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या दोन मतदारसंघामध्ये यावेळी गांधी घराण्याचा उमेदवार असेल की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान, न्यूज तकच्या विशेष कार्यक्रम 'साक्षात्कार'मध्ये इंडिया टुडे ग्रुपचे 'Tak' क्लस्टरचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. शनिवारी (27 एप्रिल)  काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. पण त्याआधी दिलेल्या मुलाखतीत खरगे यांनी अमेठी आणि रायबरेली या दोन जागांवर दावा करण्याबाबत मोठे संकेत दिले आहेत.

हे ही वाचा>> 'आरशात पाहिलं की लायकी कळेल', शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार! 

सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. मात्र यावेळी त्या राज्यसभेवर निवडून आल्या आहेत. यानंतर प्रियांका गांधी येथून निवडणुकीसाठी दावा करू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. तर राहुल गांधींना 2019 मध्ये अमेठीच्या जागेवर स्मृती इराणींकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर केरळमधील वायनाडमधूनही त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली होती. यावेळीही राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवली आहे. पण केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि भाजप नेते त्यांना सातत्याने टोमणे मारत आहेत की, गांधी घराण्याने अमेठी आणि रायबरेलीच्या मैदानातून पळ काढलाय का?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, आता खरगे यांनी या दोन मतदारसंघात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे लढणार की नाही याबाबत असलेला सस्पेन्स काहीसा कमी करण्याचा प्रयत्न केला  आहे. दोन्ही नेत्यांच्या निवडणूक लढविण्याच्या मुद्द्यावर खरगे म्हणाले की, 'याबाबत तुम्हाला उमेदवारी अर्ज देतानाच समजेल, कारण हा पक्षाच्या रणनीतीचा एक भाग आहे.'

म्हणजेच या मतदारसंघांमधून काँग्रेसने राहुल आणि प्रियंका यांना उमेदवारी दिल्याची चर्चा खरगे यांनी फेटाळलेली नाही. याला पक्षाची रणनीती असल्याचे सांगून ते या चर्चेला एक प्रकारे बळ देत असल्याचे दिसून आलं.

काँग्रेस CEC बैठकीत राहुल आणि प्रियंका यांच्या नावांना मिळणार मंजुरी ?

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक आज (27 एप्रिल, शनिवारी) संध्याकाळी होणार आहे. यामध्ये अमेठी आणि रायबरेली वगळता उर्वरित जागांवरही चर्चा होणार आहे. या दोन जागांवर राहुल आणि प्रियांका यांची नावे निश्चित होऊ शकतात, अशी जोरदार चर्चा आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Nanded: कुऱ्हाडीने EVM फोडलं, मतदान केंद्रात भयंकर घटना...नेमकं काय घडलं?

काँग्रेसच्या सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, ही घोषणा करण्यापूर्वी केरळमधील निवडणुका संपण्याची वाट पाहावी लागेल. कारण केरळ व्यतिरिक्त कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू या दक्षिण भारतीय राज्यांमध्ये यावेळच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळू शकेल, अशी काँग्रेसला आशा आहे. तेथील कार्यकर्त्यांचे मनोबल मजबूत ठेवण्यासाठी पक्षाने प्रथम 'साऊथ फोकस' स्ट्रॅटेजीवर काम केले आहे. त्यानंतर आता काँग्रेसने 'यूपी फोकस्ड' रणनीती पुढे आणण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेसने आतापर्यंत 317 लोकसभा जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

ADVERTISEMENT

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT