Maharashtra Breaking Live : मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा
मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा
social share
google news
 • 08:59 PM • 14 Feb 2024

  Maratha Reservation: 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन

  Maratha Reservation and Manoj Jarange Fast: मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यास आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 • 07:04 PM • 14 Feb 2024

  प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार, तटकरेंनी केली घोषणा

  अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवारी म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पटेल आता खासदारकीचा राजीनामा देऊन उद्या ते अर्ज भरणार आहेत. त्यांच्या नावाची घोषणा ही सुनील तटकरेंकडून करण्यात आली आहे.

 • 03:19 PM • 14 Feb 2024

  मनसे आमदार राजू पाटील सरकारवर भडकले

  मनोज जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह करणाऱ्या चिमुकलीचा फोटो मनसे आमदार राजू पाटील यांनी पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत राजू पाटील म्हणाले की, मनोज जरांगेची तब्येत ढासळत चालली आहे. अशावेळी सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन सर्वप्रथम जरांगेंच्या तब्येतीची दखल घेणे गरजेचे आहे. कोण चूक व कोण बरोबर हे येणारा काळ ठरवेल परंतु सरकारने कोणाच्याही जीवाशी खेळू नये, असे म्हणत राजू पाटलांनी सरकारवर टीका केली आहे. 

 • 03:13 PM • 14 Feb 2024

  देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर विश्वास दाखवला : मेधा कुलकर्णी

  आज आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे वेगळं काही आठवण्याचा गरज नाही, असे मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत. पक्षाने माझ्यावर खूप विश्वास दाखवला, देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर विश्वास दाखवला, असे देखील मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच मी सगळीकडे सक्रिय होते. पद असो किंवा नसो, मला ज्या गोष्टी पडतात त्याच्यावर मी बोलते, ज्या पटत नाही त्यावर मी बोलत नाही, असे देखील मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत. 

 • ADVERTISEMENT

 • 01:28 PM • 14 Feb 2024

  सुप्रिया सुळेंची CM शिंदेंवर टीका, 'जरांगे पाटलांची फसवणूक केली'

  जरांगे पाटलांवर अन्याय होतोय, सरकारने त्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे. घरफोड, पक्षफोड, इन्कम टँक्स, सीबीआय आणि ईडी लावणे आणि लोकांना भिती दाखवणे, इतकाच उद्योग ट्रिपल इंजिन सरकार करतेय, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला. 

  पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा मला माहित नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच बैठकीतला तपशील देखील त्यांनी सांगितला. लोकसभेच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या जागावाटपावर चर्चा, प्रचार आणि सभांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. 

  तसेच इंडिया आघाडीचे कोणते नेते महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. पवार साहेब लोकसभा निवडणूक लढणार नाही आहेत, सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे कोणकोणत्या ठिकाणी  प्रचार करणार याबाबत चर्चा झाली, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

  राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हासोबत आम्ही कोर्टात जाणार आहोत. निवडणूक आयोगाचा निर्णय़ आम्हाला योग्य वाटत नाही. प्रांजलपणे निवडणूक आयोगाने फाऊंडर मेंबरकडून पक्ष काढून घेतला. हे अयोग्य आणि दु:खद आहे. शरद पवारांकडून अदृष्य शक्तींच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला गेला आहे. ही चुकीची घटना आहे. आम्ही मेरीटवर पास करणारे लोक, आम्ही पेपर कॉपी करून आम्ही पास झालो नाही. त्यामुळे दुसऱ्याचं हिसकावून घेण्याची आमची प्रवृत्ती नाही, असा टोला सुप्रिया सुळेंनी भाजपला लगावला. 

 • 12:52 PM • 14 Feb 2024

  सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढणार नाही

  काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या राजस्थान राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसेने राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, या यादीत सोनिया गांधी यांचे नाव आहे. गेल्या काही दिवसापासून सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढतील, अशी चर्चा होती. अखेर या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान आता सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवणार असल्याने त्या लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 • ADVERTISEMENT

 • 11:33 AM • 14 Feb 2024

  'जरांगे पाटलांना मुख्यमंत्री शिंदेंनी फसवलं'

  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे विश्वगुरू आहेत, यांना अशोक चव्हाण सारखे लोक लागतात,तर याचा अर्थ महाराष्ट्रातील भाजप ही कमकुवत आहे,असा टोला विनायक राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे.  काँग्रेसचे अशोकराव चव्हाण गेल्याने कोणतीही पक्षाला हानी झालेली नाही. काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये गेल्याने नक्कीच भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचं नुकसान होणार एवढं मात्र नक्की, असे देखील विनायक राऊत म्हणाले आहेत. तसेच 
  मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फसवलं आहे, असा आरोप देखील विनायक राऊत यांनी केला. 
   

 • 11:30 AM • 14 Feb 2024

  बारामतीत व्यापाऱ्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

  गेल्या पाच दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील उपोषण सुरू असताना देखील सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष होतेय, असा आरोप करीत आज सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. पवारांच्या बारामतीत देखील या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. आज सकाळी पासूनच सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग घेतला आहे. येत्या काळात  आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा मराठा बांधवांनी दिला आहे. 

 • 11:27 AM • 14 Feb 2024

  पुलवामा हल्ल्यावरून काँग्रेसने PM मोदींना केलं टार्गेट

  काही अनुत्तरीत अन काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेले प्रश्न...
  पुलवामा हल्ल्यात वापरले गेलेले 300 किलो RDX आलेलं कुठून? आणि त्या मार्गावर आलंच कसं?
  मोदी सरकारने CRPFला जवानांच्या वाहतुकीसाठी एअरक्राफ्ट देण्यास मनाई का केली?
  मिलिटरी प्रोटोकॉल प्रमाणे बटालियन जाण्यापूर्वी बटालियन जाणाऱ्या मार्गाचे सॅनिटायझेशन का नाही झालं?
  कोणाच्या नाकर्तेपणामुळे हा हल्ला झाला?
  असेच अजून बरेच प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं पीएम मोदींनी द्यायला हवीत, पण ते नेहमीप्रमाणे मौन आहेत..
   

 • 11:20 AM • 14 Feb 2024

  '...तरीही उद्धव ठाकरेला संपवता आलं नाही', अहमदनगरमधून 'ठाकरी' तोफ धडाडली

  सगळ्या बाजूने घेरले. खासदाराला ही फोडलं. त्या खासदाराला माहिती नाही ज्यांनी निवडून दिलं ते निष्ठावंत माझ्यासोबत राहिलेले आहेत. त्यामुळे भाजपने इतके प्रयत्न करून सुद्दा उद्धव ठाकरेला संपवता येत नाही, असे उद्धव ठाकरे अहमदनगरमध्ये बोलत होते. गढूळ आणि गाळ मिश्रित पाणी यांना निवडणूकीत पाजावी लागेल. आता इतके पैसै दिले तर पैसै गेले कुठे हा चौकशीचा मुद्दा आहे, असेही ठाकरे म्हणाले आहेत.  

  आम्ही हिंदुत्व नाही सोडलं. आमचं हिदुत्व हे इतर धर्मीयांना कळालं आहे. आमचं हिंदुत्व हे आग  लावणारे हिदुत्व नाही, तर देश रक्षण करणार हिंदुत्व आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच ते जे म्हणातायत मोदी गँरंटी. मोदी गँरंटी... त्यांना उद्धव गँरंटीचे लोकार्पण करण्याची वेळ आली आहे. आता उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो, याला आता पंतप्रधान साक्ष असतील, असेही ठाकरे म्हणाले आहेत. 

 • 10:49 AM • 14 Feb 2024

  राऊतांचा भाजपवर हल्ला, 'भ्रष्टाचाऱ्यांशी तुम्ही लव्ह मॅरीज...'

  मी नाही, मोदी त्यांना भ्रष्टाचारी म्हणतायत. उलट आम्ही त्यांना प्रोटेक्शन देतोय. त्यांच्यावर अन्याय होतोय. श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख मोदींनी, अमित शहांनी केलाय. त्यामुळे त्यांना उत्तर द्यायचंय. जर ते भ्रष्टाचाऱ्यांशी होते तर तुम्ही त्यांच्याशी लव्ह मॅरीज, अफेअर कसा करताय, असा टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला आहे. 

 • 10:18 AM • 14 Feb 2024

  बीडमध्ये बंदला उस्फुर्त प्रतिसाद

  मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. या बंदमध्ये बीड जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधव सहभागी झाले आहेत. बीड शहरामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपली बाजारपेठेमधील दुकाने बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे.

   बीड शहरातील मुख्य मार्केट सुभाष रोडवर सकाळपासूनच शुकशुकाट पाहायला मिळत आहे. बंद शांततेत करण्याचे आवाहन प्रशासन व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व मार्केट आज सकाळपासूनच बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 • 09:07 AM • 14 Feb 2024

  मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, नाकातून रक्तस्त्राव

  मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्याच्यातून नाकातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी उपचारासाठीही नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी बंदची हाक दिली आहे. 

 • 09:01 AM • 14 Feb 2024

  आज पार पडणार श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा

  आज वसंत पंचमी श्री.विठ्ठल व श्री.रुक्मिणी माता विवाह सोहळ्या निमित्त श्री.विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व संपूर्ण मंदिरात फुलांची सुंदर व मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे...तसेच देवाला शुभ्र पोशाख परिधान करण्यात आला आहे. आज श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा पार पडणार असून मंदिर समितीने जय्यत तयारी केली आहे.

 • 08:53 AM • 14 Feb 2024

  मराठा संघटनांची बंदची हाक

  मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज जालना, बीड आणि नाशिकमधील अनेक गावांमध्ये बंदची हाक देण्यात आली. 
   

 • 08:53 AM • 14 Feb 2024

  अशोक चव्हाण आज उमेदवारी अर्ज भरणार

  काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता त्यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळण्याचे निश्चित झालं आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आज राज्यसभेचा अर्ज भरणार आहेत. 

follow whatsapp

ADVERTISEMENT