ISRO : गणेश चर्तुर्थीच्या मुहूर्ताला आदित्य L1 ने दिली खुशखबर, महत्वाचा टप्पा पूर्ण - Mumbai Tak - aditya l1 gets send off sun earth l1 point isro performs key manoeuvre - MumbaiTAK
बातम्या शहर-खबरबात

ISRO : गणेश चर्तुर्थीच्या मुहूर्ताला आदित्य L1 ने दिली खुशखबर, महत्वाचा टप्पा पूर्ण

ISRO : आदित्य L1ने आता गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पृथ्वीचा निरोप घेतला आहे. मंगळवारी रात्री 18 सप्टेंबरला रात्री 2 वाजताच्या सुमारास आदित्य L1ने पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत पृथ्वीचा निरोप घेतला आहे.
aditya l1 gets send off sun earth l1 point isro performs key manoeuvre

सुर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 2 सप्टेंबर 2023 रोजी आदित्य L1 हे यान अंतराळात पाठवले होते. या आदित्य L1 ने मोठं यश प्राप्त केले आहे.इस्त्रोने या संदर्भात मोठी माहिती दिली आहे. आदित्य L1ने आता गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पृथ्वीचा निरोप घेतला आहे. मंगळवारी रात्री 18 सप्टेंबरला रात्री 2 वाजताच्या सुमारास आदित्य L1ने पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत पृथ्वीचा निरोप घेतला आहे. त्यामुळे आदित्यला आता एल 1 बिंदूपर्यंत प्रवास करावा लागणार आहे? हा प्रवास किती किलोमीटरचा असणार आहे? त्यासोबत आदित्य सुर्यापासून आणखीण किती अंतर दुर असणार आहे? हे जाणून घेऊयात. (aditya l1 gets send off sun earth l1 point isro performs key manoeuvre)

इस्त्रोने ट्विट करून आदित्य L1बाबत मोठी माहिती दिली आहे. आदित्य L1 ने मंगळवारी रात्री 18 सप्टेंबरला रात्री 2 वाजताच्या सुमारास पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून पृथ्वीचा निरोप घेतला आहे. त्यामुळे आदित्य L1यान आता सुर्याच्या दिशेने निघाले आहे. अंतराळयान आता एका मार्गावर आहे जे त्याला सूर्य-पृथ्वी L1 बिंदूवर घेऊन जाईल. सुमारे 110 दिवसांनंतर एका मॅन्युवरने ते L1 च्या भोवतालच्या कक्षेत टोचले जाईल, अशी देखील इस्त्रोने माहिती दिली आहे. तसेच ट्रान्स-लॅग्रेंजन पॉइंट 1 इन्सर्शन (TL1I) मॅन्युवर यशस्वीरित्या काम करत असल्याची माहिती देखील इस्त्रोने दिली आहे.

विशेष म्हणजे ही सलग पाचवी वेळ आहे की इस्रोने एखाद्या प्रक्षेपण मार्गावर एखादी वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तु किंवा अवकाशातील स्थानाकडे हस्तांतरित केली आहे.

वैज्ञानिक डेटा गोळा

आदित्य-L1 ने वैज्ञानिक डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे.STEPS इन्स्ट्रुमेंटच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून 50,000 किमी पेक्षा जास्त अंतरावरील सुप्रा-थर्मल आणि ऊर्जावान आयन आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे. हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवती असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत करतो. खालील आकृतीत ऊर्जावान कण वातावरणातील भिन्नता दर्शविते, एका युनिटद्वारे गोळा केली जाते.

 

रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक काय घडलं त्यांच्या नात्यात… सुहाना ते सारा… टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज! Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट? राघव-परिणीती यांची कशी झाली पहिली भेट? पाहा Photo Ganesh Visarjan : गणपती चालले गावाला… मुंबईत दणक्यात होणार बाप्पाचं विसर्जन! Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्थी दिवशी बाप्पाच्या विसर्जनाचं महत्त्व काय? आमिर खान पोहचला बाप्पाच्या दर्शनासाठी, हात जोडून केली प्रार्थना… Mumbai Traffic : गणपती विसर्जनाच्या दिवशी ‘या’ रस्त्यांवरून जाणं टाळाच भारतीय क्रिकेटर तापाने फणफणले! रोहित शर्मा म्हणाला.. 10 वर्षांनी मोठ्या सैफसोबत कशी सुरूये करिनाची मॅरेज लाईफ? लग्नानंतर परिणीती चोप्रा मुंबई सोडून जाणार? कारण… ठाण्यात फ्लॅटमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा Viral VIDEO भूमी पेडणेकरची Butt Bag, किंमत तब्बल… ओठांच्या आकारावरून समजते पर्सनॅलिटी, तुमची कशी आहे ओळखा? रिकाम्या पोटी गोड पदार्थांचं सेवन टाळा! नाहीतर… दारूचा ‘पेग’ कसा आला? काय आहे अर्थ? भारतीय क्रिकेटरला ‘देवी’ म्हणत चिनी फॅन पोहोचला 1300 किमी दूर! शाहरुखच्या ‘जवान’ने 18 दिवसांत पार केला 1000 कोटींचा गल्ला पण…