स्लीपर बसमध्ये पत्नीच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार, दाजीने एवढ्यावरच थांबला नाही म्हणाला, तुझे...
मध्य प्रदेशातील मैहर मधून एका तरुणाने आपल्याच मेव्हणीवर स्लीपर बसमध्ये बलात्कार केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

स्लीपर बसमध्ये मेव्हणीवरच बलात्कार

मेव्हणीसोबत घाणेरडं कृत्य करून दाजी फरार

नेमकी घटना काय?
MP Crime News: मध्य प्रदेशातील मैहर मधून नातेसंबंधाला लाज आणणारी एक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्याच मेव्हणीवर स्लीपर बसमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आपल्याच मेव्हणीसोबत असं घाणेरंड कृत्य करून तो तिथून पळून गेला. पीडित तरुणाने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तिच्या दाजीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
स्लीपर बसमध्ये केला बलात्कार
या प्रकरणातील पीडित तरुणी 21 वर्षांची असून तिच्या दाजीने म्हणजेच बहिणीच्या नवऱ्याने चालत्या स्लीपर बसमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने 3 जुलै रोजी रेवा सिटी कोतवाली येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती, त्यानंतर हे प्रकरण मैहर पोलिस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आलं आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिस छापे टाकत असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थीनींना केलं विवस्त्र, पालकांनी जाब विचारत केला संताप, नेमकं काय घडलं?
स्टेशनवर झाली भेट अन्...
तक्रारदार पीडितेने सांगितल्याप्रमाणे, ती तरुणी तिच्या दाजीसोबत बऱ्याचदा फोनवर बोलायची. 26 जून रोजी ती दुपारी 1 वाजता ती रेवा येथे पोहोचली आणि तिथे तिला बडी पुलजवळ आरोपी म्हणजेच तिचा दाजी भेटला. दोघांनी एकत्र नाश्ता केला आणि नंतर रेवा रेल्वे स्टेशनवरून हैदराबादला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले. कुटुंबियांना ते दोघे एकत्र असल्याचं कळताच त्यांनी आरोपी तरुणावर दबाव आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोघेही कटनी स्टेशनवर उतरले. रात्री 9 वाजताच्या सुमारास दोघांनीही रेवाला परत येण्यासाठी स्लीपर बस पकडली.
हे ही वाचा: अनैतिक संबंधातून मुलाचा जन्म! बाळाला विकलं अन् प्रेयसीवरच्या संशयातून डबल मर्ड...
विरोध केल्यावर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
रात्री 10.30 च्या सुमारास बस अमरपाटणजवळ पोहोचली असता आरोपीने बसमध्ये पीडित तरुणीवर बलात्कार केला. तिने विरोध या सगळ्याला विरोध केला तेव्हा आरोपीने तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर, तो अमरपाटणमध्ये बसमधून उतरला आणि पळून गेला. पीडित तरुणी कशीतरी रेवा येथे पोहोचली. तिच्यासोबत झालेल्या घाणेरड्या कृत्यामुळे तिची तब्येत बिघडली आणि तब्येत खालावल्यामुळे पीडितेला संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी 28 जून रोजी उपचारादरम्यान पीडितेने तिच्या मोठ्या बहिणीला तिच्यासोबत घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती दिली. रेवा एसपी सुधीर अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गंभीर असून ते मैहर पोलिसांकडे सोपवण्यात आलं आहे आणि तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे आणि आरोपीचा शोध सुरू आहे.