अनैतिक संबंध, अबॉर्शन.. लिव्ह इन रिलेशन अन् पुढे तर...! तुम्हीही सुन्न होऊन जाल अशी भयंकर कहाणी!
दिल्लीतील 'मजनू का टीला' परिसरात तरुणाने त्याच्या आधीच्या लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसी आणि त्याच्या मित्राच्या सहा महिन्यांच्या मुलीचा गळा चिरून खून केल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रेयसीच्या संशयावरून दोघांची गळा चिरून हत्या

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला विकलं अन्...

मित्राच्या 6 महिन्यांच्या मुलीची केली हत्या
Delhi Crime News: साथीदारावरचा संशय जीवघेणा ठरल्याच्या बऱ्याच बातम्या तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. दिल्लीतील 'मजनू का टीला' परिसरातून अशीच एक बातमी समोर आली आहे. आपल्या प्रेयसीवरच्या संशयामुळे तरुणाने जे काही केलं ते ऐकून पायाखालची जमिनच सरकेल. या प्रकरणातील आरोपी तरुणावर त्याच्या आधीच्या लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसी आणि त्याच्या मित्राच्या सहा महिन्यांच्या मुलीचा गळा चिरून खून केल्याचा आरोप आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
आपल्याच नवजात बाळाला विकलं
या प्रकरणातील आरोपीचं नाव निखिल कुमार असून त्याच्या प्रेयसीचं नाव सोनल आर्या असल्याची माहिती समोर आली आहे. 2023 मध्ये हल्द्वानी येथे निखिल आणि सोनलची भेट झाली. कालांतराने त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यांच्यात अनैतिक संबंध बनले आणि त्यातून सोनल गरोदर राहिली. त्यावेळी तिने गर्भपात न करता एका 2024 मध्ये एका मुलाला जन्म दिला. दोघेही अविवाहित असल्याकारणाने सोनल आणि निखिलने त्यांच्या नवजात बाळाला उत्तराखंडमध्ये 2 लाख रुपयांना विकले. त्यानंतर दोघे दिल्लीला येऊन वजीराबाद येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. याच काळात, निखिलचा मित्र दुर्गेश याच्यासोबत आपल्या प्रेयसीचे संबंध असल्याचा निखिलला संशय आला. कारण त्यांच्या फोनमध्ये त्याला सोनल आणि दुर्गेशचे चॅट्स सापडले.
हे ही वाचा: भयंकर! डॉक्टरने नवजात अर्भकाला केलं मृत घोषित, कुटुंबियांनी अंत्यसंस्काराची केली तयारी अन् बाळ लागलं रडू
पुन्हा गरोदर राहिली...
त्यानंतर सोनल पुन्हा गरोदर राहिली. बाळाला जन्म देऊन लग्न करू आणि एकत्र राहू, असं निखिलने सोनलला सांगितलं. मात्र, या सगळ्याला सोनलने नकार दिला आणि तिने गर्भपात केला. सोनलने दुर्गेशच्या मदतीने गर्भपात केल्याचा निखिलला संशय आला. त्यानंतर त्या दोघांमध्ये खूप वाद झाले. त्यांच्यातील वादामुळे ते दोघे वेगळे राहू लागले. मग एके दिवशी निखिल सोनलला शोधण्यासाठी दुर्गेशच्या घरी गेला. सोनल दुर्गेशच्या घरी होती. त्यावेळी निखिल सोनलशी बोलत असताना दोघांमध्ये वाद झाला आणि निखिलने सर्जिकल ब्लेडने सोनमचा गळा चिरला. दुर्गेशची नवजात मुलगीही तिथे जवळच होती. दुर्गेशच आपल्या बाळाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा विचार मनात ठेवून निखिलने दुर्गेशच्या नवजात मुलीचा गळा चिरून खून केला आणि तिथून तो पळून गेला.
मंगळवारी दुपारी 'मजनू का टीला' परिसरात या डबल मर्डरची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी 22 वर्षीय सोनल आर्या आणि सहा महिन्यांच्या मुलीचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळले. पोलिसांना या प्रकरणाबद्दल फोन करून माहिती देणारी महिला तिच्या पती आणि दोन मुलींसह तिथे राहत होती.
हे ही वाचा: Govt Job: इंडियन कोस्ट गार्डमध्ये मोठ्या पदांसाठी भरती... काय आहे अर्जाची शेवटची तारीख?
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिस आणि कर्मचारी निरीक्षक रोहित सारस्वत यांच्यासह त्यांची टीम उत्तराखंडला रवाना झाली. आरोपी निखिलचे वडील, भाऊ आणि मित्रांच्या चौकशीतून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे निखिलचा शोध घेण्यासाठी एक टीम हल्द्वानीला रवाना झाली. टेक्निकल सर्व्हिलान्स द्वारे निखिलचे नंबर तपासल्यानंतर तो उत्तराखंडमधील अनेक लोकांशी संपर्कात असल्याचं आढळून आलं. दरम्यान, हल्द्वानीला पोहोचलेल्या टीमने त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीची चौकशी केली. त्यानंतर निखिल टनकपूर जवळील बनबसा बॉर्डरच्या रस्त्याने नेपाळला पळून जाण्याची योजना करत असल्याचं आढळून आलं. टीमने सापळा रचला आणि हल्द्वानी सोडण्यापूर्वीच निखिलला ताब्यात घेतलं.