मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थीनींना केलं विवस्त्र, पालकांनी जाब विचारत केला संताप व्यक्त, नेमकं काय घडलं?
Crime News Shahapur : इंग्रजी माध्यामिक शाळेत विद्यार्थिनींना मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने विवस्त्र करत त्यांचा छळ करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनींना केलं विवस्त्र

शहापूर शहरातील दमाणी इंग्लिश स्कुलमधील घटना
Crime News Shahapur : एका इंग्रजी माध्यामिक शाळेत विद्यार्थिनींना मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने विवस्त्र करत त्यांचा छळ करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातील दमानी इंग्लिश स्कुलमधील माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आलीस. पीडित विद्यार्थीनींच्या पालकांच्या तक्रारीवरून मुख्यध्यापिकेसह आठ जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पाच शिक्षिका आणि दोन महिला कर्मचाऱ्यांसह दोन शिपायांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना 8 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 च्या सुमारास घडली आहे.
हेही वाचा : भयंकर! डॉक्टरने नवजात अर्भकाला केलं मृत घोषित, कुटुंबियांनी अंत्यसंस्काराची केली तयारी अन् बाळ लागलं रडू
दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये धक्कादायक प्रकार
संबंधित प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापूर शहरातील आर एस दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये जवळपास 300 विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. मुख्यध्यापिकांनी विद्यार्थीनींना शाळेच्या एका हॉलमध्ये बोलावले होते. त्यानंतर शाळेतील मुलीच्या स्वच्छता गृहाच्या भिंतीवरील लादीवर रक्ताचे डाग असलेले फोटो प्रोजेक्टरवर दाखवण्यात आले होते.
त्यावेळी त्यांनी विद्यार्थींनींना मासिक पाळीबाबत विचारले. त्यानंतर सर्वच विद्यार्थीनींच्या हाताचे ठसे घेण्यात आले. तसेच काही मुलींना आपल्याला मासिक पाळी आली नसल्याचं सांगितलं होतं. तेव्हा शिक्षिकांनी त्यांना स्वच्छता गृहात नेलं आणि संबंधित विद्यार्थीनींचे कपडे काढण्यात आले. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीबाबत तपास करण्यास सांगितले.
मासिक पाळीबाबत शिक्षण देण्याऐवजी...पालकांचा संताप
या धक्कादायक घटनेची माहिती समजताच पालकांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 जुलै रोजी शाळेत धाव घेत, आपल्या मुलींसोबत जे काही घडलं त्याचा जाब विचारू लागले. विद्यार्थींनींना मासिक पाळीबाबत शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक संतुलन बिघडवल्याचं काम शिक्षकांनी केल्याचा लज्जास्पद प्रकार केल्याचा आरोप केला आहे. संबंधित प्रकरणात आता दमाणी स्कूलच्या मुख्यध्यापिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : लग्नापूर्वीच तरुण होणाऱ्या बायकोला भेटायला गेला, घरी कोणीच नव्हतं...नेमकं काय घडलं?
दरम्यान, पीडित विद्यार्थीनींचे पालक थेट पोलीस ठाण्याच्या आवारात आले. अखेर पोलिसांनी शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 74, 76, 11, 12,29 पोक्सो कायद्यांतर्गत मुख्यध्यापिकेसह 5 शिक्षिका आणि शाळा प्रशासनाच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.