'गरोदर राहायचं होतं', मुंबईच्या नीतूने छांगुर बाबाची घेतली मदत अन् नवऱ्यासोबत मिळून... तरुणीची ‘ही’ कहाणी टाकेल चक्रावून!
उत्तर प्रदेशातील छांगुर बाबा हा नवीन वोहरा और नीतू वोहरासोबत मिळून हे रॅकेट चालवत होता. दरम्यान, मुंबईची नीतू वोहरा देखील चर्चेत आली आहे. नीतूसोबत नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गरोदर होण्यासाठी मुंबईची तरुणी आली छांगुर बाबाच्या संपर्कात
मुंबईच्या नीतूने छांगुर बाबासोबत मिळून केलं भलतंच!
Mumbai Crime: छांगुर बाबाच्या धर्मांतरच्या रॅकेटने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरून गेला होता. छांगुर बाबा हा नवीन वोहरा और नीतू वोहरासोबत मिळून हे रॅकेट चालवत होता. सध्या, छांगुर बाबा उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, मुंबईची नीतू वोहरा देखील चर्चेत आली आहे. खरंतर नीतू आणि नवीन हे पती-पत्नी आहेत. पण दोघेही छांगुर बाबाच्या संपर्कात आले आणि त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. नंतर तिघांनीही हिंदू मुलींना त्यांच्या जाळ्यात अडकवण्यास सुरुवात केली.
कोण आहे नीतू वोहरा उर्फ नसरीन?
मिळालेल्या माहितीनुसार, नीतू नवीन वोहरा ही तामिळनाडूची रहिवासी आहे. नीतूचं लग्न नवीन वोहराशी झालं होतं. मात्र, लग्नानंतर तिला मुलं झाली नाहीत. तिला गरोदरपणात काही अडचणी येत होत्या. या काळात नवीन बलरामपूरच्या छांगुर बाबाच्या संपर्कात आला.
छांगुर बाबाशी संपर्क वाढत गेला...
नीतू आणि नवीन मुंबईहून बलरामपूरला बाबाला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी गरोदरपणात अडचणी आणि काही मानसिक त्रास होत असल्याचं नितूने बाबाला सांगितलं. हे ऐकून छांगुर बाबाने तिला काही औषधे दिली आणि त्याची एक अंगठी सुद्धा दिली. त्यानंतर नवीन आणि नितू मुंबईहून बऱ्याच वेळा बलरामपूरला आले आणि बाबाला भेटू लागले.
हे ही वाचा: "समलिंगी संबंधाचे अश्लील व्हिडीओ..." मुंबईतील CA ला धमकी अन् उचललं टोकाचं पाऊल!
छांगुर बाबाने नीतू वोहरा आणि तिचा पती नवीन वोहरा यांचे धर्मांतर केले. धर्मांतर केल्यानंतर नीतू वोहरा यांचे नाव नसरीन आणि नवीन वोहरा यांचे नाव जमालुद्दीन असे ठेवण्यात आले.









