मुंबई: 'आई माझ्यासारखा मुलगा तुला कधीही देऊ नये...', समलिंगी संबंध ठेवले अन् तरूण CA चं सगळंच संपलं!

मुंबई तक

मुंबईतील वाकोला शहरातून 32 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटला शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल 2.47 कोटी रूपये उकळण्याचा प्रयत्न केल्यामुळे या त्रासाला कंटाळून पीडित तरुणाने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

समलिंगी संबंधाने CA तरूणाचा खेळच केला खल्लास!
समलिंगी संबंधाने CA तरूणाचा खेळच केला खल्लास! (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

समलिंगी संबंधाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

point

मुंबईतील CA ला पैसे उकळण्यासाठी धमकी

point

त्रासाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

Mumbai Crime: मुंबईतील वाकोला शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 32 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटला शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल 2.47 कोटी रूपये उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पीडित तरुणाने विष घेऊन स्वत:चं आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी वाकोली पोलिसांनी दोघांविरुद्धा गुन्हा दाखल केला आहे. 

प्रकरणातील आरोपींना अटक 

मिळालेल्या माहितीनुसार,  32 वर्षीय सीए राज मोरे याच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपींचं नाव राहुल परवानी आणि सबा कुरेशी असल्याचं सांगितलं जात आहे.  दोघांनी मिळून राजला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून 2.47 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. राहुल मॉडेलिंग करतो, तसेच सबा त्याची सहकारी असल्याची माहिती समोर आली आहे. राज आणि राहुल यांच्या समलिंगी संबंधांचे व्हिडिओ दाखवून राहुल आणि सबा त्याला ब्लॅकमेल करत असल्याचा पोलिसांनी आरोप केला आहे. या प्रकरणात पीडित तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आली आहे. 

शारीरिक संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्ड ...

वाकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज मोरे शीव येथील एका प्रतिष्ठित कंपनीत सीए म्हणून कार्यरत होता. तो आपल्या आईसोबत मुंबईतील सांताक्रूझ परिसरामध्ये रहात होता. सप्टेंबर 2024 मध्ये इंस्टाग्रामद्वारे राज आणि राहुल एकमेकांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. पुढे वेगवेगळ्या ठिकाणी दोघांमध्ये शारीरिक संबंध आले. यावेळी राहुलने दोघांचे एकत्रित व्हिडिओ रेकॉर्ड केले. सबा कुरेशीसह राहुल हा राजला ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातूनच त्यांनी मोठ्या रकमेची मागणी केली होती. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून राजने विष घेऊन आपलं जीवन संपवल्याचा पोलिसांनी आरोप केला आहे. 

हे ही वाचा: Pune Crime : शरीरसंबंधांना चटावला तरुण, लग्नाचे आमिष दाखवून तरुणींशी शरीरसंबंध, तरुणी गर्भवती राहताच बाळ...

आईसाठी सुसाईट नोट

आत्महत्या करण्यापूर्वी राजने आपल्या आईसाठी सुसाईट नोट देखील लिहिली होती. "माझी प्रिय आई, मला माफ कर, मी एक चांगला मुलगा नाही होऊ शकलो. तुला माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण मीच तुला एकटं सोडून जात आहे. मी माझ्या कर्माची फळं भोगत आहे. देव तुला पुढच्या आयुष्यात माझ्यासारखा मुलगा कधीही देऊ नये. मी खूप वाईट वागलो आहे, पूनम मावशी, कृपया माझ्या आईची काळजी घ्या. माझी विविध खात्यांमध्ये पॉलिसी आहेत, ते पैसे घ्या आणि माझ्या आईला द्या. माफ करा," असे राजने त्या चिट्ठीत लिहिले होते. 

हे ही वाचा: 12 वर्षांच्या मुलाच्या हाताला चावला, सटासट कानशिलात मारल्या कारण फक्त.. हा विचित्र माणूस आहे तरी कोण?

पोलिसांनी दिली माहिती   

वाकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल आरोपी राहुल परवानी लोखंडवाला येथील एका लॉजमध्ये राहत होता. तो आणि सबा कुरेशी यांनी राजवर पैशासाठी दबाव टाकला. त्यांच्या बँक खात्याची तपासणी करत असून 2024 पासून मोरेकडून घेतलेले पैसे कुठे वापरण्यात आले, याचा देखील शोध सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. हे पैसे शेअर मार्केट आणि ऑनलाइन गेमिंगमध्ये गुंतवल्याचं राहुलने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, राहुल परवानीने राज मोरेच्या नावावर बँकेतून SUV गाडीसाठी कर्ज घेतले. त्याचे हप्ते (EMI) सुद्धा राजच भरत होता.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp