Pune: तरूणीला OYO हॉटेलवर नेलं, गरोदर राहिली.. तिच्या मैत्रिणीसोबतही शरीरसबंध, हिंजवडीतील धक्कादायक प्रकार

मुंबई तक

pune crime : पुण्यातील हिंजवडीत तरुणीशी प्रेमसंबंध ठेऊन गर्भपात करण्यास तरुणाने भाग पाडले. त्याचे अनेक तरुणींशी प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी तरुणाचे नाव आदर्श वाल्मीक मेश्राम असे आहे.

ADVERTISEMENT

तरूणीवर अत्याचार, गर्भपातही केला.. पुण्यातील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)
तरूणीवर अत्याचार, गर्भपातही केला.. पुण्यातील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात गर्भपाताची घटना

point

आदर्श नावाच्या तरुणाचं मोठं कांड आलं समोर

Pune Crime: पुण्यात वाढत्या गुन्हेगारीसह लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशातच पुण्यात गर्भपाताची घटना उघडकीस आलेली आहे. एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध ठेवले आणि त्यामुळे ती प्रेग्नंट राहिली. यावर बॉयफ्रेंडने तरुणीला गर्भपाताची गोळी खाऊ घालत गर्भपात करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हिंजवडी येथे घडली. पीडिता तरुणीचं वय वर्षे 28 आहे. तर आरोपीचं नाव आदर्श वाल्मीक मेश्राम (वय 28) असे आहे. 

हेही वाचा : Mumbai Weather: समुद्रही खवळणार! वादळी वाऱ्यांसह मुंबईला झोडपणार मुसळधार पाऊस, रेल्वे वेळापत्रकावरही होणार परिणाम?

नेमकं प्रकरण काय? 

पीडिता आणि आरोपी हे हिंजवडीतील एकाच आयटी पार्क कंपनीत काम करायचे. पीडिता ही कंत्राटदार आहे, तर आरोपी हा इंजिनियर आहे. 2018 पासून त्यांचे प्रेमसंबंध होते. आदर्श वाल्मीक मेश्रामने अनेक तरुणींना लग्न करण्याचं खोटं आश्वासन द्यायचा आणि नंतर तरुणींसोबत शरीरसंबंध ठेवायचा. 

शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यास मारहाण

पीडितेनं लग्नाचा विषय काढल्यानंतर तो त्या विषयाकडे दुर्लक्ष करायचा. याचदरम्यान पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, आदर्श वाल्मीक मेश्रामचे इतर तरुणींसोबत प्रेमसंबंध होते. 2024 मध्ये त्याने एका पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून हिंजवडीच्या oyo हॉटेलमध्ये नेलं आणि तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. जर संबंध ठेवण्यास नकार दिल्यास तरुणींना मारहाण करायचा असा आरोप करण्यात आला.

23 जून 2025 या आदर्शच्या वाढदिवशी पीडित तरुणी ही यवतमाळहून पुण्याला आली होती. आदर्शचा मोबाईल फोन पाहिल्यानंतर पीडितेला समजलं की आदर्शचं इतर काही तरुणींसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, शरीरसंबंध ठेवल्याने पीडित तरुणी गर्भवती राहिली होती. तेव्हा पीडितेनं आदर्शच्या जुन्या मैत्रिणीशी संपर्क साधला असता, आदर्शच्या कारनाम्यांचं बिंग फुटलं. आदर्शने तिच्याही एका जुन्या मैत्रिणीशी शरीरसंबंध ठेवले होते, अशी माहिती समोर आली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp