भाजपात निघालेल्या राहुल बोंद्रे यांना राहुल गांधी यांनी फोन करून कसं थांबवलं?

मुंबई तक

भाजपात जाण्याचा निर्णय बदलत काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेताना नेत्याला अश्रू अनावर झाले. हा व्हिडिओ आहे काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा. बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात त्यांची मोठी राजकीय ताकद आहे.

ADVERTISEMENT

Rahul Bondre
Rahul Bondre
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राहुल गांधींचा फोन

point

राहुल बोंद्रे यांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय रद्द

Rahul Bondre : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या राजकीय प्रवासात एक नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केला होता, अगदी पक्षप्रवेशाची तारीखही ठरली होती. मात्र, ऐन वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा फोन आला आणि बोंद्रे यांचे मनपरिवर्तन झाले. राहुल गांधी यांच्याशी झालेल्या संवादानंतर भावुक झालेल्या बोंद्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय रद्द करत काँग्रेसमध्येच निष्ठावंत राहण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे.

राहुल बोंद्रेंना अश्रू अनावर

या राजकीय घडामोडीला कलाटणी देणारा राहुल गांधी आणि राहुल बोंद्रे यांच्यातील फोनवरील संवादाचा तपशीलही समोर आला आहे. या संवादात राहुल गांधी यांनी बोंद्रे यांना धीर देत, "पराभवाशिवाय विजय मिळत नाही, पराभव हाच विजयाचा पाया आहे," असे सांगत लढण्याची प्रेरणा दिली. आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने एका कार्यकर्त्याची दखल घेतल्याचे पाहून राहुल बोंद्रे यांना अश्रू अनावर झाले. "सर्वस्व गमावले तरी चालेल, पण आता तुमची साथ सोडणार नाही आणि नव्या हिंमतीने लढेन," अशी ग्वाही बोंद्रे यांनी या वेळी राहुल गांधींना दिली.

हे ही वाचा : कॉमेडियन पुलकित मणी यांना मंचावर बोलवणं आणि पीएम मोदी यांची मिमिक्री करणं हा अपमान?

जारी केला होता व्हिडीओ

या मनपरिवर्तनापूर्वी राहुल बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाची घोषणा करणारा एक व्हिडीओ जारी केला होता. त्यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाने दिलेल्या संधी, पदे आणि जीवाभावाच्या माणसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. आदरणीय मुकुल वासनिक यांनी राजकीय वाटचालीत दिलेले मार्गदर्शन आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी एका भावासारखी दिलेली मोलाची साथ आपण कधीही विसरू शकणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. राजकीय वाट वेगळी निवडली असली तरी जुन्या सहकाऱ्यांबद्दलचे प्रेम आणि आदर कायम राहील, अशी कृतज्ञतेची भावना त्यांनी या व्हिडिओत व्यक्त केली होती.

हे ही वाचा : 'मुलाला वापरले जातीवरून नको ते शब्द, 'त्या' दोन प्राध्यापकांना...'. साहिल वाकडेच्या वडिलांचे गंभीर आरोप

राहुल गांधींच्या फोनने दिली कलाटणी

त्याच व्हिडिओमध्ये बोंद्रे यांनी आपली वैचारिक भूमिकाही स्पष्ट केली होती. शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी मांडलेले विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान यांच्याबद्दल आपल्या मनात कायम आदर असल्याचे त्यांनी नमूद केले होते. राजकीय रस्ते वेगळे असले तरी प्रेम आणि सद्भावना कायम राहतील असे सांगत त्यांनी पक्षांतराची भूमिका मांडली होती. मात्र, राहुल गांधींच्या एका फोन कॉलने या संपूर्ण चित्राला कलाटणी देत त्यांना पुन्हा काँग्रेसच्याच विचारधारेत आणि पक्षात कायम ठेवले आहे.