12 वर्षांच्या मुलाच्या हाताला चावला, सटासट कानशिलात मारल्या कारण फक्त.. हा विचित्र माणूस आहे तरी कोण?

मिथिलेश गुप्ता

Ambernath Viral Video: केवळ लिफ्टच्या दरवाज्याचं बटण बंद केलं म्हणून एका व्यक्तीने 12 वर्षीय मुलाला लिफ्टमध्येच मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

अंबरनाथमधील धक्कादायक घटना
अंबरनाथमधील धक्कादायक घटना
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अंबरनाथमध्ये लिफ्टमधील बालकावर हल्ला

point

लिफ्टचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून मारहाण

point

अंबरनाथ मधील धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

point

पोलिसांच्या हलगर्जीविरोधात पालकांचा संताप

अंबरनाथ: अंबरनाथ मधील पालेगाव परिसरातील पटेल झेनॉन या गृहप्रकल्पात राहणाऱ्या 12 वर्षाच्या मुलावर लिफ्टमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रकारानंतरही पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. ज्याबाबत पीडित मुलाच्या कुटुंबाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकी घटना काय?

शंकरलाल पांडे यांचा 12 वर्षांचा मुलगा त्यागी पांडे हा 4 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास ट्युशनसाठी घरातून निघाला होता. तो इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून लिफ्टने खाली येत असताना लिफ्ट 9व्या मजल्यावर थांबली. दरवाजासमोर कोणीच दिसत नसल्याने त्याने दरवाजा बंद करण्यासाठी बटण दाबले. पण दरवाजा बंद होत असतानाच नवव्या मजल्यावर राहणारा कैलास थावाणी हा लिफ्टमध्ये शिरला.

हे ही वाचा>> वासनेने हपालेला नराधम, डोक्यात फक्त असायचे 'शारीरिक संबंध'.. वासनांध तरूणाचा सुरू हैदोस!

लिफ्टमध्ये शिरलेल्या या विक्षिप्त थावाणीने थेट लहानग्या त्यागीच्या सटासट कानशिलात लगावल्या. नेमकं काय झालं हे न कळल्याने सुरुवातीला त्यागी हा गयावया करू लागला. पण विक्षिप्त थावाणी एवढ्यावरच थांबला नाही तर, त्याने छोट्या त्यागीच्या हाताचा चक्क चावा घेतला.

दरम्यान, त्यावेळी लिफ्टमध्ये एक साफसफाई कर्मचारी महिला देखील उपस्थित होती. या मारहाणी दरम्यान, तिने थावाणीला रोखण्याचा बराच प्रयत्न केला. पण मुजोर थावाणीने तिला दाद लागू दिली नाही आणि छोट्या त्यागीला भयंकर मारहाण करत राहिला. अखेर त्या महिलेने प्रसंगावधान राखत लिफ्ट तळ मजल्यावर थांबताच त्यागीला लिफ्टमधून बाहेर काढलं. मात्र लॉबीमध्ये पुन्हा एकदा कैलासने त्यागीवर हात उचलला. या वेळी सुरक्षारक्षक आणि काही रहिवाशांनी हस्तक्षेप करत त्यागीचा बचाव केला आणि त्याला घरी पाठवले.

हे ही वाचा>> तुमच्याही काळाजाचा थरकाप उडेल.. दीड महिन्याचा मुलाला आईने उकळत्या पाण्यात उकळून काढलं!

या घटनेनंतर त्यागीच्या आईने थेट शिवाजी नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला. ज्यामुळे पांडे कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

संपूर्ण घटना इमारतीतील सीसीटीव्हीत कैद असूनही संबंधित आरोपीवर कठोर कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांनी देखील संतापाची भावना व्यक्त केली आहे. आता या प्रकरणात अंबरनाथ पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp