Maharashtra Board HSC Result 2023: ..तर तुम्हाला 12वीचा निकाल पाहता येणार नाही! - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Maharashtra Board HSC Result 2023: ..तर तुम्हाला 12वीचा निकाल पाहता येणार नाही!
बातम्या शहर-खबरबात

Maharashtra Board HSC Result 2023: ..तर तुम्हाला 12वीचा निकाल पाहता येणार नाही!

maharashtra board hsc result 2023 Roll number is going to be very important to check 12th result

Maharashtra Board HSC Roll Number, MSBSHSE 12th Result 2023: मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 12वीचा निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. बारावीचा निकाल केव्हा जाहीर केला जाणार याबाबत विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज (24 मे) निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. (maharashtra board hsc result 2023 Roll number is going to be very important to check 12th result)

बारावीचा निकाल हा ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आपल्याला निकाल पाहण्यासाठी रोल नंबरची गरज असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जे रोल नंबर देण्यात आले होते तेच त्यांना ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी वापरावे लागणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर mh-hsc.ac.in वरुन देखील आपला रोल नंबर डाऊनलोड करु शकतात.

Maharashtra Board 12th Roll Number: असा डाऊनलोड करा आपला रोल नंबर

1.  mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.

2. मागितलेली माहिती तिथे भरा.

3. तुमचं पूर्ण नाव टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.

4. रोल नंबर स्‍क्रीनवर येईल. त्यानंतर आपण तो डाउनलोड करु शकता.

हे ही वाचा >> Hingoli Crime: वडिलांचे हात-पाय बांधले अन् नराधमाने आईवरच केला बलात्कार

HSC Result 2023 – निकाल कसा पाहता येईल?

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे बारावी (HSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल mahahsscboard.in यावर जाहीर करणार आहे.
  • सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन
  • होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र बारावीचा निकाल 2023 या लिंकवर क्लिक करा.
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.
  • यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो रोल नंबर दिला असेल तो टाकावा लागेल.
  • त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना SUBMIT हे बटण दाबावं लागणार आहे.
  • समजा, तुमचा सीट नंबर M574841 असेल आणि तुमच्या आईचे नाव ‘पूजा’ असं असेल तर तुम्ही M574841 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच PUJ असं टाकावं लागेल.
  • त्यानंतर SUBMIT या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल काही क्षणात आपल्याला दिसेल.
गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्… ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल! दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’ अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!