Mumbai Tak /बातम्या / Old Pension Scheme : शिक्षक संपावर; विद्यार्थ्यांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ
बातम्या शहर-खबरबात

Old Pension Scheme : शिक्षक संपावर; विद्यार्थ्यांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ

Old Pension Scheme News :

चंद्रपूर : जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्ण, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतं असल्याचं समोर आलं आहे. चंद्रपूरमध्ये शिक्षकांच्या संपाविरोधात संपामुळे विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरले आहेत. “जो पर्यंत शिक्षक शाळेत येत नहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहिलं असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे. (Old Pension Scheme : Students protest as teachers are on strike)

नेमकं काय घडलं?

चंद्रपुर जिल्यातील वरोरा तालुक्यातील आसाळा गावामध्ये जिल्हा परिषद शाळेची मुलं शिक्षक पाहिजे म्हणून रस्त्यावर उतरले आहेत. शिक्षक संपावर आहेत, शाळेत शिकवायला येत नाहीत, आमच्या अभ्यासाचे नुकसान होतं, म्हणून विद्यार्थ्यांनी गावात चक्काजाम आंदोलन सुरु केलं असून, गावातून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली.

आसाळा प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या मुलांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे आसाळा गावातील वाहतूक ठप्प झाली आहे. यावेळी विद्यार्थी मुलांनी शिक्षकांच्या विरुद्ध घोषणा देत त्यांना शाळेत लवकर येण्याची विनंती केली आहे. गावातील पालक समितीचे अध्यक्ष आणि गावकरी मुलांच्या या आंदोलनात सहभागी असून शाळा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होतं आहे.

Old Pension Scheme : जुनी पेन्शन सुरू होणार? मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. या संपात सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. मात्र सार्वत्रिक प्रतिक्रिया बघता हा संप सामान्य जनतेला पटलेला नाही असं चित्र आहे.

OPS : विधान परिषद निवडणुकीत गेम चेंजर असलेली ‘जुनी पेन्शन योजना’ काय आहे?

“शिक्षक संपात सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली, जिल्हा परिषद शाळेत सर्वसामान्य कुटुंबातील मुलं शिक्षण घेतात. त्यात परीक्षा तोंडावर आहेत, ऐन परीक्षेच्या तोंडावर तरी किमान शिक्षकांनी अशी भूमिका घ्यायला नको होती, अशी भावना आसाळा गावातील पालकांनी व्यक्त केली.

2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव