Anju returned India: पती-मुलं नाराज, वडीलही भडकले; पाकिस्तानातून परतलेली अंजू आता काय करणार?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Anju returned to india : राजस्थानातील अलवर येथून पाकिस्तानात गेलेली अंजू आता भारतात परतली आहे. भारतात परतल्यानंतर आयबी (IB) आणि पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स टीमने अंजूची कसून चौकशी केली. तिने सांगितले की ती तिच्या मुलांसाठी भारतात आली आहे. चौकशीदरम्यान अंजूने तिचा धर्म बदलून पाकिस्तानच्या नसरुल्लाह या फेसबुक मित्राशी लग्न केल्याचे कबूल केले. यावेळी अंजूबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Anju returned to india from Pakistan Father and children are angry What will She do now)

ADVERTISEMENT

अंजूच्या घर वापसीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ती अचानक भारतात आल्याने सर्वांनाच धक्का बसला. अंजू आता पाकिस्तानची नागरिक झाली आहे का?, अंजूने नसरुल्लासोबत लग्न केले आहे का?, भारतीय महिला पाकिस्तानात जाऊन अशा प्रकारे लग्न करू शकते का?, अंजूचे धर्मांतर झाले आहे का?… असे बरेच प्रश्न विचारले जात आहेत.

वाचा: Rajasthan Exit Poll 2023: भाजप की काँग्रेस.. राजस्थानमध्ये कोणाचं येणार सरकार?

या प्रश्नांमुळे अंजू आणि दोन देशांची सरकारे आता कोंडीत सापडली आहेत. ती 5 महिन्यांनी भारतात आली आहे. तिच्या व्हिसाची मुदत संपली आहे, पण प्रश्न अजूनही कायम आहे. सोशल मीडियावर अंजूचे प्री-वेडिंग शूट सर्वांनी पाहिले. अंजूने धर्म बदलल्याच्या बातम्या सोशल मीडियावर आल्या होत्या. आता ती अंजू नाही तर फातिमा बनली आहे. अंजूच्या मदतीसाठी काही लोकही पुढे आले. तिचे गेल्या काही दिवसांपूर्वीचे अनेक व्हिडीओही समोर येत आहेत. ज्यात तिने म्हटलं होतं की, तिला तिच्या मुलांसाठी भारतात यायचं आहे.

हे वाचलं का?

वाचा: पोलिसांच्या श्वान ‘लिओ’ची कमाल, बेपत्ता मुलाचा काही तासातच घेतला शोध

वडिलांनीही साथ देण्यास दिला नकार

अंजू आज (30 नोव्हेंबर) भारतात आली त्यावेळी आयबी आणि पंजाब पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. यानंतर ती विमानाने दिल्लीला पोहोचली. पतीच्या घरी न जाता ती तेथून वडिलांच्या घरी ग्वालेहरला जाणार असल्याचं तिने माध्यमांसमोर सांगितलं.

पण, या सर्वात अंजूच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. गयाप्रसाद थॉमस (अंजूचे वडील) म्हणाले की, ‘तोंडाला काळे फासून ती पाकिस्तानातून आली आहे. आता जे आहे ते अरविंद (पहिला पती) आणि पोलिसांनाच माहित आहे. माझा तिच्याशी कोणताही संबंध नाही. तिला माझ्या घरात प्रवेश नाही.’

ADVERTISEMENT

वाचा: ‘…म्हणून मामाने तर जुगाड केला’, बावनकुळेंचा नेमका रोख कोणाकडे?

भारतात परतलेली अंजू आता काय करणार?

आता सर्वांना प्रश्न पडला आहे की, ना सासरचं घर आहे ना तिच्या वडिलांचे घर. अंजू आता कुठे जाणार? पुढे तिचा काय विचार आहे? चार महिन्यांपूर्वी पाकिस्तानात पोहोचलेली अंजू भारतात परतली, पण तिच्या कुटुंबीयांना तिचं तोंड पाहाण्याचीही इच्छा नाही आहे. सध्या ती दिल्लीत आहे. अंजूचा पहिला पती अरविंद राजस्थानमधील भिवडी, अलवर येथे राहतो. माहितीनुसार, ती पहिल्या पतीला घटस्फोट देण्यासाठी आली आहे आणि जर मुलांची इच्छा असेल तर ती त्यांना पाकिस्तानात घेऊन जाईल असं बोललं जात आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT