Rajasthan Election Exit Poll 2023: राजस्थानमध्ये काँग्रेस काठावरच, भाजप ठरणार अव्वल?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

rajasthan assembly election exit poll results 2023 live update
rajasthan assembly election exit poll results 2023 live update
social share
google news

Rajasthan Assembly Election Exit Poll Result: आज राजस्थानसह 5 राज्यांमध्ये मतदानाचा शेवटचा दिवस आहे (Rajasthan election 202). तेलंगणामध्ये आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे (voting in rajasthan). निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून एक्झिट पोल जाहीर करता येतील. 3 डिसेंबरला पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी, एक्झिट पोल लोकांना आगामी निकालांबद्दल बरीच माहिती देऊ शकतात. तथापि, एक्झिट पोल पूर्णपणे अचूक असतील असा दावा करता येणार नाही.

LIVE UPDATE:

  • थोड्याच वेळात एक्झिट पोलला होणार सुरुवात
  • राजस्थानमध्ये भाजप, काँग्रेस या राजकीय पक्षांबरोबरच बसपलाही एक जागा मिळण्याची शक्यता
  • राजस्थानमध्ये काही भागात भारतीय जनता पार्टीच्या जागांना मोठा फटका
  • दलित आणि मुस्लीम मतदारांवर राजस्थानमध्ये आकड्यांचा खेळ रंगणार
  • सचिन पायलट यांच्या नावाचा काँग्रेसला फायदा होणार नाही
  • भाजपचे हिंदू-मुस्लीम कार्ड राजस्थानमध्ये चालणार नाही.
  • मेवाडमध्ये काँग्रेसला 29 जागा मिळण्याची शक्यता तर भाजपला 18 जागा मिळण्याची शक्यता
  • मारवाडमध्ये भाजपला 40 टक्के तर काँग्रेसला 41 टक्के मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  • भाजपला 80 ते100 जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला 80-106 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अपक्ष 9-18 जागांवर येण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोल-ओपिनियन पोल कधी आणि कुठे सुरू झाला?

अशा प्रकारचे सर्वेक्षण पहिल्यांदा अमेरिकेत निवडणुकीच्या काळात सुरू झाले. जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रॉबिन्सन यांनी सरकारच्या कामाचा अभिप्राय मिळविण्यासाठी सर्वेक्षण केले होते. नंतर ब्रिटन आणि फ्रान्समध्येही मतदान सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर जर्मनी आणि आयर्लंडसह अनेक देशांमध्ये अशा प्रकारचे सर्वेक्षण सुरू झाले. भारतातील पहिले मतदान सर्वेक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने केले होते. 1980 च्या दशकात पत्रकार प्रणव रॉय आणि निवडणूक तज्ज्ञ डेव्हिड बटलर यांनी एक सर्वेक्षण केले. 1996 मध्ये, CSDS (सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज) च्या सर्वेक्षणाची खूप चर्चा झाली. हे दूरदर्शनवर प्रसारित झाले होते. 1998 पासून खासगी टीव्ही चॅनेलवरही एक्झिट पोल दाखवले जाऊ लागले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या टीव्ही चॅनेल्स आणि एजन्सींचे सर्वेक्षण चर्चेत

इंडिया टुडे Axis My India
एबीपी-सी वोटर
टाइम्स नाऊ
न्यूज24 टुडे चाणक्या
इंडिया टीव्ही
जी न्यूज
न्यूजएक्स-नेता
रिपब्लिक-जन की बात
सीएसडीएस
न्यूज18-आयपीएसओएस

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT