Udayanraje Bhosale : 'तुमच्यासमोर रडतील पण मत देऊ नका', उदयनराजेंनी मिमिक्री करून साधला निशाणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

raj thackeray critize udhhav thackeray on bjp shiv sena alliance kankavali rally narayan rane lok sabha election 2024
2014, 2019 च्या दरम्यान ज्या काही गोष्टी केंद्र सरकारने केल्या त्या मला पटल्या नाहीत.
social share
google news

Udayanraje Bhosale Mimicri : सातारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज सभा पार पडली. या सभेला देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरून भाषण करताना उदयनराजेंनी मिमिक्री करून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. तुमच्यासमोर हे रडतील पण मत देऊ नका, असे आवाहन उदयनराजेंनी (udayanraje bhosale) नागरीकांना केले आहे. (udayanraje bhosale mimicry and criticize opposition satara lok sabha election shashikant shinde) 

ADVERTISEMENT

उदयनराजे यावेळी म्हणाले की,  त्यांनी तुम्हाला चिरडण्याच काम केलं, त्या पक्षाला चिरडण्याच काम तुमच्या हातून झाले पाहिजे. या लोकांची लायकी तरी आहे का, लोकांसमोर जाण्याची.. काम न करता कुठल्या तोंडाने जाणार? काम न करता मला मतं द्या. मग लोकं म्हणतात त्यांना सहानुभूती मिळते. अशाप्रकारची सहानुभूती म्हणत... उदयनराजेनी मिमिक्री केली. 

हे ही वाचा : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका, 'तेव्हा सत्तेचा बोळा कोंबला असतात तोंडात...'

''माझं चुकलं, आमचं चुकलं खूप भ्रष्टाचार केला, खूप लुबाडलं याच्यापुढे करणार नाही, पण यावेळेस आम्हाला संधी द्या. तुम्ही देणार का संधी? लाज वाटली पाहिजे, आले तर त्यांना धरून ठेवा, त्यांना सोडू नका दामटून ठेवा. जो पर्यंत तुमचे पैसै परत करत नाही, तोपर्यंत त्यांची व्यवस्थित खातेदारी करा, असे उदयनराजेंनी म्हटले. 

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

संपूर्ण सातारा महायुती आणि उदयनराजेंच्या पाठीशी आहे. साताऱ्यात 6 पैकी 4 आमदार महायुतीचे असल्याने उदयनराजेंचा विजय निश्चित असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच यामिनी जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होत असला तरी कोरोना काळातील भ्रष्टाचाराचा बोलवता धनी कोण आहे हे लवकरच एक्सपोज करणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.शरद पवारांची छान पध्दत आहे. सगळ भाष्य करायच अन मग म्हणायच भाष्य करणार नाही. पण त्यांनी कराव कारण मोदीचं जीवन खुल्या पुस्तकाप्रमाण आहे. जे मोदीवर बोलतील त्याच्यावरच भाष्य उलटेल, अशी टीका फडणवीस यांनी शरद पवारांवर केला. 

हे ही वाचा : 'दोन दिवसात मोठा स्फोट करणार', संजय राऊतांचा हाती काय लागलं?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT