Uddhav Thackeray : 'मोदींवर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईन, पण...', ठाकरेंचा PM मोदींना टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

uddhav thackeray criticized pm narendra modi dharashiv lok sabha election 2024 omraje nimbalkar
मोदीजी तुमच्यावर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईल
social share
google news

Uddhav Thackeray Criticized Narendra Modi : 'उद्धव ठाकरेंवर संकट आलं तर मी पहिला त्यांच्या मदतीला धावून जाईन', असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केले होते. मोदींच्या याच विधानाचा आता उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय. 'मोदीजी तुमच्यावर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईल, पण तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्र आणि देशावरती आलात आहात. तुमचा तुम्ही स्वत:ला आवर घाला, असा टोला ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान मोदींना (Pm Narendra Modi) लगावला. ( uddhav thackeray criticized pm narendra modi dharashiv lok sabha election 2024 omraje nimbalkar) 

धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मुलाखत दिली. त्यामध्य़े ते काहीतरी म्हणाले. यानंतर मला अनेकांनी मेसेज केले आणि विचारले मोदींना तुमच्यावर प्रेम कसे आले. मीही त्यांना म्हटलं, मलाही  त्यांच्याबद्दल प्रेम आहे. मात्र मोदींचे प्रेम एवढे उतू गेले आहे की, ते म्हणाले, शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे. त्यांच्याबद्दल मला प्रेम, आस्था आहे. मग मी ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तो माजी विचारपूस करायचे. मग हे जर खरे असेल तर तेव्हा ते तुमच्या खालच्या माणसांना माहिती नव्हतं का? एका बाजूला तुम्ही चौकशी करत होता, मग हे तुमचे पाव उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती नव्हतं का?अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केली. 

हे ही वाचा : 'मला शिवसेनेला दगाफटका करायचा नव्हता', राज ठाकरेंचा रोख कोणाकडे?

माझ्या आजारपणात उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गद्दार हे रात्री गाठीभेटी करत होते. माझे सरकार कसे पाडायचे हे ठरवत होते. मग हे पंतप्रधान मोदी तुम्हाला माहिती नव्हतं का? असा सवाल ठाकरेंनी पंतप्रधानांना केला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : 'दोन दिवसात मोठा स्फोट करणार', संजय राऊतांचा हाती काय लागलं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT