'मला शिवसेनेला दगाफटका करायचा नव्हता.. ओरबाडायचं नव्हतं', राज ठाकरेंचा नेमका रोख कोणाकडे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना थेट सुनावलं?
राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना थेट सुनावलं?
social share
google news

Raj Thackeray on Shiv Sena: मुंबई: 'मला बाळासाहेब आणि त्यांचा पक्ष यांना कोणताही प्रकारचा दगाफटका करायचा नव्हता.' मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी केलेलं हे विधान आता महत्त्वाचं ठरत आहे. (lok sabha election 2024 i didnt want to hurt balasaheb or shiv sena said raj thackeray targeted eknath shinde)

ADVERTISEMENT

शिवसेना पक्ष ज्या पद्धती फुटला ते राज ठाकरेंना आवडलं नसल्याचं त्यांनी बोल भिडू या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्यांच्या या बोलण्याचा रोख हा एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा>> '..तर मोदींविरोधात बोलले असते का?', राज ठाकरेंचा भावाला सवाल!

सध्या राज ठाकरे हे महायुतीचा भाग आहेत. त्यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढवत नसले तरीही त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता त्यांनी जे विधान केलं त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

हे वाचलं का?

'दुसऱ्यांना ओरबाडण्यात काही अर्थ नाही', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

'शिवसेना हा बाळासाहेबांचा पक्ष... मला पक्षाचं नेतृत्व करायचं.. तुम्ही सांगाल तिथे मी हात ठेवायला तयार आहे. एकविरा देवी असेल तर तिथेही.. माझ्या मनाला कधी शिवलं देखील नाही की, या पक्षाचं प्रमुख व्हावं. तुम्ही कशावरही मला हात ठेवायला सांगा..' 

'माझी मागणी एवढीच होतं की, माझं नेमकं काय काम आहे ते सांगा.. मला तुम्ही फक्त निवडणुकीसाठी प्रचाराला बाहेर काढणार असाल आणि नंतर फक्त बसवून ठेवणार तर मला ते मान्य नाही.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'मी पहाटे 5 वाजताच उठतो..', राज ठाकरेंनी सगळा दिनक्रमच..

'माझ्या काकाला मदत.. एवढाच हेतू होता. वय असं होतं की, काही वेळेला चुका देखील झाल्या असतील. बोलण्यातून वागण्यातून चुका झाल्या असतील. पण माझा हेतू कधीही त्या पक्षाचं प्रमुख व्हावं आणि पक्ष ताब्यात घ्यावा असा नव्हता.' 

ADVERTISEMENT

'मी जेव्हा पक्ष सोडला त्यावेळेला माझ्याकडे 32 आमदार आणि 6-7 खासदार होते. की, आपण एकत्र बाहेर पडू.. मी म्हटलं की, पक्ष फोडून मला काहीच करायचं नाही.' 

'जर माझा हेतू हा पक्षप्रमुख होण्याचं असतं.. तर मी त्या लोकांना पक्ष फोडून बाहेर काढलं असतं. पण मला बाळासाहेब आणि त्यांचा पक्ष यांना कोणताही प्रकारचा दगाफटका करायचा नव्हता. मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो.' 

'असंही नव्हतं की, मी कुठे तरी बाहेरच्या बाहेर परस्पर निर्णय घेऊन गेलो होतो. मी बाळासाहेबांना सांगितलं मी हा विषय बंद करतोय..' 

'मी जेव्हा बाहेर पडलो होतो तेव्हा मी जाहीर केलं होतं की, बाळासाहेबांनी माझ्यावर वाटेल त्या थराला जाऊन टीका केली.. तरी माझ्याकडून उलट उत्तर येणार नाही.' 

'मला असं वाटतं की, उद्या जर समजा तुम्हाला काही गोष्ट नाही पटली ना तर तुमची स्वत:ची उभी करा. दुसऱ्यांना ओरबाडण्यात काही अर्थ नाही. तिथे सर्वात जास्त नुकसान होतं. तुम्हाला नाही पटलं तर नाही पटलं.. तुमची रेष तुम्ही आखा.. आहे त्यात विष कालवण्यात काय अर्थ आहे?' असं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT