Raj Thackeray: 'CM पद दिलं असतं तर मोदींविरोधात बोलले असते का?', राज ठाकरेंचा भावाला खडा सवाल!

मुंबई तक

ADVERTISEMENT

राज ठाकरेंचा भावाला खडा सवाल!
राज ठाकरेंचा भावाला खडा सवाल!
social share
google news

Lok Sabha Election 2024: मुंबई: 'यांना सत्तेवरून हाकलवलंय.. काढले, यांचे पक्ष फुटले म्हणून हे विरोधात गेलेत.. यांना मुख्यमंत्री पद दिलं असतं तर बोलले असते का? समजा त्यावेळेस बोलले असते की, मुख्यमंत्री पद पहिला चान्स तुमचा.. तर मोदींबद्दल बोलले असते का?' असं म्हणत राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री आणि आपले चुलत भाऊ उद्धव ठाकरेंवर टीका केली. (lok sabha election 2024 if he had been given the post of cm would he have spoken against modi raj thackeray asked uddhav thackeray)

ADVERTISEMENT

राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. याच टीकेनंतर आता राज ठाकरेंनी देखील विरोधकांना धारेवर धरलं आहे. बोल भिडू या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवलाय.  

'यांना सत्तेवरून हाकलवलं, म्हणून आता...'

'मी आता फक्त मोदींना समर्थन केलंय. हा विषय लोकसभेच्या दृष्टीकोनातून नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचा हा विषय आहे. मी त्यांच्यावर टीकाही प्रचंड केली. त्याची कारणंही मी त्या सभेमध्ये दिली. मी आतापर्यंत जे बोललोय.. हे आताचे जे पक्ष आहेत त्यापैकी काही बोलत देखील नाही. काही तरी थातूरमातूर बोलत देखील नाही.'

हे वाचलं का?

हे ही वाचा>> 'एवढ्या जागा जिंकणार', पवारांनी सांगितलेला आकडा ठरणार खरा?

'कसंय.. यांना सत्तेवरून हाकलवलंय.. काढले, यांचे पक्ष फुटले म्हणून हे विरोधात गेलेत..'

'यांना मुख्यमंत्री पद दिलं असतं तर बोलले असते का? समजा त्यावेळेस बोलले असते की, मुख्यमंत्री पद पहिला चान्स तुमचा.. तर मोदींबद्दल बोलले असते का? ह्यांना काहीतरी हवं होतं. पण ते मिळालं नाही म्हणून ते बोलत आहेत. माझं तसं नव्हतं.' 

'मला भूमिका नाही पटल्या.. ज्या मला आजही नाही पटत.. जी गोष्ट मी तेव्हा उघडपणे सांगितली ती आजही मी उघडपणे सांगतोय.' 

'आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्याकडून 19-20 असा काही प्रकार झाला की, तो जो राग येतो.. तो सर्वात टोकाचा राग असतो. ज्याच्यावर विश्वास नसतो त्याने काही वेडंवाकडं वागलं तर आपण 4 शिव्या हासडून सोडून देऊ.' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'मी पहाटे 5 वाजताच उठतो..', राज ठाकरेंचं सगळा दिनक्रमच..

राज ठाकरेंनी हे उत्तर देताना विरोधकांवर निशाणा तर साधला आहेच पण भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याच्या स्वत:च्या निर्णयाचं त्यांनी समर्थन देखील केलं आहे. 

ADVERTISEMENT

मनसे सध्या लोकसभा निवडणूक लढवत नाहीए. मात्र, असं असलं तरीही त्यांचा पाठिंबा हा सर्वच पक्षांना महत्त्वाचा ठरणार आहे. कारण त्यांची स्वत:ची Vote बँक देखील आहे. ज्याचा महायुतीला काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. 

मात्र, राज ठाकरेंनी या निवडणुकीसाठी जी भूमिका घेतली आहे ती त्यांच्या मतदारांना कितपत पटलीए हे आपल्याला काही दिवसातच समजेल.  

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT