Ratnagiri Sindhudurg Lok Sabha 2024 : 'उद्धव ठाकरेंची औकात काय? रुग्ण आहेस रुग्णच राहा'; नारायण राणेंचा पलटवार

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

narayan rane reply udhhav thackeray ratnagiri sidhudurg lok sabha 2024 maha vikas aghadi vinayak raut candidate
उद्धव ठाकरेची काय औकात आहे. रूग्ण आहेस रूग्णच राहा.
social share
google news

Narayan Rane Reply Uddhav Thackeray : 'शुभ बोल रे नाऱ्या, तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो, काय लाज नाही, लज्जा नाही, नुसता बडबडतोय आपला', अशी टीका शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर केली होती. ठाकरेंच्या या टीकेला आता नारायण राणेंकडून (Narayan Rane) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 'उद्धव ठाकरेची काय औकात आहे. रूग्ण आहेस रूग्णच राहा. माझ्या आडवा येऊ नको', असा पलटवार नारायण राणे यांनी ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केला आहे. (narayan rane reply udhhav thackeray ratnagiri sidhudurg lok sabha 2024 maha vikas aghadi vinayak raut candidate)

ADVERTISEMENT

नारायण राणे टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. यावेळी राणेंनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले होते. ''उद्धव ठाकरेंची काय औकात आहे, मी मनात नुसतं आणलं ना तरी बरच काहितरी करू शकतो. तो काय बोलतो आडवा उभा...समोर तरी येना...कोण कोणाला उभा आडवा करतो बघूया, तुला अंग जरी हलवायला दिलं तर काहीही हरेन मी. उगाच ती भाषा करू नको, तुझं काम नाही ते, रूग्ण आहेस रूग्णच राहा'', असा सल्लावजा टोला नारायण राणे यांनी ठाकरेंना लगावला आहे.

हे ही वाचा : 'मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय चिंताजनक', पवारांचा PM मोदींना टोमणा

राणे पुढे म्हणाले, ''तू काय गाडून जातो, तुझी औकात काय आहे. माझ्या आडवा येऊ नको, धमक्या बिमक्या देऊ नको, पोलीस प्रोटेक्शन घेऊन कधीही फोन कर मी इथे येतो'', असे आव्हान देखील नारायण राणेंनी ठाकरेंना दिले. तसेच अरे तुझे 56 आमदार होते, त्यातले राहिलेत 16, त्यामधून आता 10 जातील मग केवळ 6 सोबत राहतील, असं मोठं विधान देखील नारायण राणे यांनी केले. 

हे वाचलं का?

तसेच ''कोकण तुझं आहे कशावरून रे, मुख्यमंत्री असताना तू कोकणासाठी काय दिलं? पाच पण्णास लोकांना नोकऱ्या दिल्यास, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना बाळासाहेबांसाठी काढली, त्यामध्ये तुझं कर्तृत्व काय? उगच थापा मारू नको, बंडलबाज माणूस आहे, विकृत माणूस आहे'', अशी टीका नारायण राणे यांनी ठाकरेंवर केली. तसेच तीन लाख मताधिक्यांनी निवडून येऊन, असा विश्वास देखील राणेंनी यावेळी व्यक्त केला. 

हे ही वाचा : 'मी सत्तेसाठी हापापलेलो नाही...', अजित पवार भडकले

ठाकरे काय म्हणाले होते? 

''शुभ बोल नाऱ्या, आता मी येतो म्हटल्यावर कसे येतात बघतो.मी येऊन उभा आहे. परत कसे जातात ते बघतो. तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो, अरे लाज वाटली पाहिजे, दोन तीन वेळा तुझ्याइकडे येऊन तुला आडवा केला.मग माझ्या घरात आला तिकडे येऊन तुला साफ केला. लाज नाही लज्जा नाही, बडबडतोय आपला'', अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर केली होती. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT