बीड हादरलं, भरदिवसा कामगारावर गोळ्या झाडल्या, पण नेम चुकला, मग धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं

मुंबई तक

Beed Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. अंकुश नगर परिसरात नाल्याचे काम सुरू असताना हर्षद उर्फ दादा शिंदे हे कामात व्यस्त होते. त्याचवेळी अचानक एक व्यक्ती घटनास्थळी आली आणि हर्षद यांच्यावर बंदुकीतून दोन राऊंड फायर केले. मात्र सुदैवाने त्या गोळ्या हर्षद यांना लागल्या नाहीत.

ADVERTISEMENT

Beed Crime News
Beed Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बीड हादरलं, भरदिवसा कामगारावर गोळ्या झाडल्या

point

पण नेम चुकला, मग धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं

Beed Crime News ,बीड : शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना आज (दि. 6 जानेवरी 2026) दुपारी उघडकीस आली. बीड शहरातील अंकुश नगर परिसरात भरदिवसा नाल्याचे काम करत असलेल्या एका कामगारावर आधी गोळीबार करण्यात आला. मात्र नेम चुकल्यामुळे गोळ्या त्याला लागल्या नाहीत. त्यानंतर आरोपीने पाठलाग करत धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण बीड शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भरदिवसा गोळीबार पण नेम चुकल्याने धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. अंकुश नगर परिसरात नाल्याचे काम सुरू असताना हर्षद उर्फ दादा शिंदे हे कामात व्यस्त होते. त्याचवेळी अचानक एक व्यक्ती घटनास्थळी आली आणि हर्षद यांच्यावर बंदुकीतून दोन राऊंड फायर केले. मात्र सुदैवाने त्या गोळ्या हर्षद यांना लागल्या नाहीत. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच गोंधळ उडाला आणि कामगार तसेच स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली. गोळीबार अयशस्वी ठरल्यानंतरही आरोपी थांबला नाही. त्याने हर्षद यांचा पाठलाग सुरू ठेवला. काही अंतरावर जाऊन आरोपीने धारदार शस्त्र काढत हर्षद यांच्यावर एकामागून एक वार केले. गंभीर जखमी अवस्थेत हर्षद जमिनीवर कोसळले. आसपासच्या लोकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत हर्षद यांचा मृत्यू झाला होता. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा : '..तर विलासराव देशमुखांच्या मुलांची मी दिलगिरी व्यक्त करतो', टीकेची झोड उठल्यानंतर रवींद्र चव्हाणांचं स्पष्टीकरण

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव हर्षद उर्फ दादा शिंदे असून आरोपीचे नाव विशाल सूर्यवंशी असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसराची नाकेबंदी करून तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले असून त्यांनी पुरावे गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली असून या हत्येमागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे. जुना वाद, वैयक्तिक राग किंवा इतर कोणते कारण आहे का, याबाबत विविध शक्यतांचा विचार केला जात आहे. आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. शहरातील विविध भागात नाकाबंदी करून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp