'..तर विलासराव देशमुखांच्या मुलांची मी दिलगिरी व्यक्त करतो', टीकेची झोड उठल्यानंतर रवींद्र चव्हाणांचं स्पष्टीकरण
Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : मोदींजींच्या नेतृत्वात तिथे विकासात्मक काम झालंय, हेच मी सांगत होतो. तरीसुद्धा त्यांचे (विलासराव देशमुख) चिरंजीव माझे मित्र आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विलासराव देशमुखांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे टीकेची झोड उठली
अखेर रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त
Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh, छत्रपती संभाजीनगर : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याबाबत बुधवारी (दि.5) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. "तुमचा उत्साह पाहून वाटतं, विलासराव देशमुखांची आठवण लातूर शहरातून पुसली जाईल", असं रवींद्र चव्हाण म्हणाले होते. लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा लातूर जिल्हा यांच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात त्यांनी ते वक्तव्य केलं होतं. दरम्यान, त्यानंतर राज्यभरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. अखेर याबाबत रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलीये.
रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केली दिलगिरी
रवींद्र चव्हाण म्हणाले, मी लातूरमध्ये जे बोललो. प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुका नागरी सुविधा कोणती पार्टी व्यवस्थित करुन देईल, यासाठी असतात. लातूरमध्ये सुद्धा गतीमान पद्धतीने नागरी सुविधा निर्माण व्हाव्यात, हे महत्ताचं आहे. याबाबत मी तिथे बोललो. मी विलासराव देशमुख यांच्यावर टीका-टिप्पणी केली नाही. मी विलासराव देशमुख मोठे नेते होते. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून देखील काम केलेलं आहे. परंतु, त्यांनाच घेऊन काँग्रेस पक्ष मत मागत आहे. त्यामुळे मोदींजींच्या नेतृत्वात तिथे विकासात्मक काम झालंय, हेच मी सांगत होतो. तरीसुद्धा त्यांचे (विलासराव देशमुख) चिरंजीव माझे मित्र आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं. विकासाच्या राजकारण त्याठिकाणी व्हायला हवं. लातूरकरांनी विकासाला महत्त्व दिलं पाहिजे. तिथे नागरी सुविधा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील केंद्र आणि राज्य सरकार देऊ शकतं.
धिरज देशमुख यांची प्रतिक्रिया
धिरज देशमुख म्हणाले, विलासराव देशमुख आणि लातूर त्यांचे नाते भाजपच्या आकलनाच्या पलीकडे आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येऊन आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या संदर्भाने जे विधान केलंय, ते अत्यंत दुर्दैवी दुःखदायक आहे, त्यांच्याकडून आणि भारतीय जनता पक्षा कडूनही अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती, त्यांच्या या वक्तव्यामुळे आम्हा सर्व लातूरकरांची मने दुखावली आहेत. आम्ही त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहोत.
इतर महत्वाच्या बातम्या










