Sharad Pawar: 'मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय चिंताजनक', पवारांचा PM मोदींना टोमणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

शरद पवारांचा PM मोदींना टोमणा
शरद पवारांचा PM मोदींना टोमणा
social share
google news

Maharashtra Lok Sabha Election 2024: मनीष जोग, जळगाव: लोकसभा निवडणूक 2024 च्या प्रचार सभा आणि मुलाखतींमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध शरद पवार असा जोरदार सामना रंगला आहे. 'शरद पवार हे या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय सांभाळणार?' अशी बोचरी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती. ज्याला आता शरद पवारांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. 'मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर ती अतिशय चिंताजनक आहे.' असा जोरदार टोमणा पवारांनी मोदींना लगावला आहे. (lok sabha election 2024 modi family background is very worrying sharad pawar taunts pm modi)

पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेवरून शरद पवार यांना जळगावमध्ये पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा पवार म्हणाले की, 'मलाही माहिती आहे की, त्यांच्याबद्दल.. त्यांनी कुठे कुटुंब सांभाळलं? पण त्या पातळीला मी जाऊ इच्छित नाही.. त्यांची जर कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर ती अतिशय चिंताजनक आहे.. पण आपण असं व्यक्तिगत बोलू नये. ते पथ्य त्यांनी पाळलं नाही. पण आपण ते पथ्य न पाळण्याची भूमिका आपण घेऊ नये.' अशा शब्दात पवारांनी मोदींच्या टीकेचा समाचार घेतला. 

'मनमोहन सिंहांची 10 वर्ष आणि मोदींची 10 वर्ष याची आता लोकं तुलना करतात..'

'देशातील परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. मागील 5 वर्षांपूर्वी मोदींबाबत जी आस्था होती तो ट्रेंड कमी आहे असं दिसतंय.. विशेषत: शेतकरी हा फार अस्वस्थ आहे आणि त्याची नाराजी या सरकारला जबरदस्त किंमत द्यावी लागेल.'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> महाराष्ट्रातील मतदान, कांद्याबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय?

'मोदींनी अनेक गोष्टी सांगितल्या पण त्या प्रत्यक्षात कृतीत आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या विषयी आस्था कमी झाली आहे. त्यांचा जो स्वभाव आहे बेछूटपणाने बोलायचं... ते झेपेल की नाही, सरकारची तशी स्थिती आहे की नाही.. याच्यावर यत्किंचितही विश्वास न ठेवात सरळपणाने ते अनेक गोष्टी कबूल करतात. विशेषत: 2014 ला जनतेसमोर अनेक गोष्टी मांडल्या.. डॉ. मनमोहन सिंहाच्या निर्णयावर अनेक ठिकाणी टीका-टिप्पणी केली.' 

'आज तेच निर्णय स्वत: राबवायचा प्रयत्न मोदी साहेब करत आहेत. त्यामुळे लोकांना त्यांचा हा विरोधाभास आता दिसतोय. यामुळे ही नाराजी आहे..'

ADVERTISEMENT

'दुसरीकडे लोकं मनमोहन सिंहांची 10 वर्ष आणि ही 10 वर्ष याची तुलना करत आहेत. मनमोहन सिंहांचं वैशिष्ट होतं की, शांतपणाने गाजावाजा न करता काम करणं, रिझल्ट देणं.. मोदी साहेबांचं रिझल्ट किती देतील ते माहिती नाही.. पण त्यावर चर्चा, भाष्य टीका-टिप्पणी यावरच त्याचा भर असतो.' असं म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारच्या कारभारावर सवाल उपस्थित केले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'तुम्ही पवारांबद्दल..' 'भटकती आत्मा'वरुन राहुल गांधींनी सुनावलं!

'मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर ती अतिशय चिंताजनक'

पवारांना कुटुंब सांभाळता येत नाही या पंतप्रधान मोदींच्या टीकेला उत्तर देताना पवार म्हणाले की, 'मलाही माहिती आहे की, त्यांच्याबद्दल.. त्यांनी कुठे कुटुंब सांभाळलं? पण त्या पातळीला मी जाऊ इच्छित नाही.. त्यांची जर कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर ती अतिशय चिंताजनक आहे.. पण आपण असं व्यक्तिगत बोलू नये. ते पथ्य त्यांनी पाळलं नाही. पण आपण ते पथ्य न पाळण्याची भूमिका आपण घेऊ नये.' अशा बोचऱ्या शब्दात शरद पवारांनी टीका केली. 

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT