Lok Sabha Election Maharashtra : सोमय्यांनी काढलेल्या वायकर, जाधवांच्या घोटाळ्यांचं पुढे काय झालं? 

राहुल गायकवाड

ravindra waikar ravindra waikar Shiv Sena Candidate : रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणांचं पुढे काय झालं?

ADVERTISEMENT

रवींद्र वायकर, किरीट सोमय्या आणि यामिनी जाधव.
शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर, भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना उमेदवार यामिनी जाधव.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रवींद्र वायकर, यामिनी जाधवांवर किरीट सोमय्यांनी केलेले आरोप

point

रवींद्र वायकर उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून लढवताहेत निवडणूक

point

यामिनी जाधव दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार

Ravindra Waikar, Yamini Jadhav : दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईमधून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर हे आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (What is current status of ravindra waikar and yamini jadhav corruption cases) 

जाधव असो, वा वायकर... या दोघांवर किरीट सोमय्यांसह भाजप नेत्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. पण, आता त्यांनाच शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी भाजपच्या वॉशिंग मशिनचा उल्लेख करण्यास सुरुवात केली आहे. 

त्याचबरोबर जाधव, वायकर यांचे स्टार प्रचारक किरीट सोमय्या यांना करावं अशी थेट उपरोधक मागणीच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केली आहे. 

यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांच्यावरील आरोपांची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांच्यावर नेमके कुठले आरोप होते, त्यांचं पुढे काय झालं?

हे वाचलं का?

    follow whatsapp