Thailand: भारतीयांना सर्वाधिक आवडतं बँकॉक, हे आहे कारण...

मुंबई तक

ADVERTISEMENT

भारतीयांना सर्वाधिक आवडतं बँकॉक
भारतीयांना सर्वाधिक आवडतं बँकॉक
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय पर्यटकांना कोणता देश आवडतो सर्वाधिक?

point

सर्व्हेमधून समोर आली नेमकी माहिती

point

बँकॉक हे भारतीयांना आवडणारं शहर

Bangkok famous for: बँकॉक: सुट्टीसाठी परदेशात जाणारे भारतीय पर्यटक बहुतेक त्यांच्या सुट्ट्या आशियामध्ये घालवण्यास प्राधान्य देतात आणि मागील काही वर्षात थायलंड हे त्यांचे प्रमुख पर्यटन स्थळ बनलं आहे. एका हॉटेलच्या वेबसाइटने जो हॉटेल प्राइस इंडेक्स (HPI) च्या अहवाल समोर आणलआ हे त्यानुसार, बहुतेक भारतीयांनी काही दिवस सुट्टी घालवण्यासाठी आशियाला प्राधान्य दिले. आशिया हे भारतीय पर्यटकांसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. (bangkok has become the most preferred tourist destination of indians know acutal reason)

ADVERTISEMENT

अहवालानुसार, मागील काही वर्षात थायलंड हे भारतीयांसाठी जगभरातील सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ बनलं आहे. जगभरातील हजारो हॉटेल्समधील भारतीयांच्या बुकिंगच्या आधारे वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे हा डेटा गोळा करण्यात आला आहे. अहवालानुसार, बँकॉक हे भारतीयांसाठी सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ आहे, ज्याने दुबईला मागे टाकून पहिले स्थान पटकावले आहे. दुबई हे पर्यटकांचे दुसरा सर्वात आवडता देश आहे.

भारतीय पर्यटकांची बँकॉकला पसंती का? 

भारतीय पर्यटक हे आता मोठ्या प्रमाणात बँकॉकला जात आहे. याचं मूळ कारण म्हणजे मागील काही महिन्यांपूर्वीच बँकॉकने भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा फ्री एंट्री म्हणजे व्हिसाशिवाय प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारतीय पयर्टक आता मोठ्या प्रमाणात बँकॉकला जात आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> बेडरुममध्ये पार्टनरला असं करा संतुष्ट, तिसरी Tips जर विसरलात तर समजा तुम्ही...

इतर देशातील पर्यटनापेक्षा बँकॉकमधील पर्यटन हे बरंच स्वस्त आहे. हे देखील एक प्रमुख कारण आहे की, भारतीय पर्यटक हे बँकॉक टूर करत आहेत. नैसर्गिक संपदा आणि मोकळंढाकळं वातावरण यामुळे देखील अनेक भारतीयांची पसंती ही बँकॉकला असल्याचं पाहायला मिळतंय. 

कोणत्या देशाला पर्यटकांची पसंती?

पर्यटनासाठी नेहमीच आवडते असलेले सिंगापूर आणि लंडन ही भारतीय पर्यटकांची तिसरी आणि चौथी आवडती पर्यटन स्थळं आहेत. भारतीय पर्यटकांसाठी बाली हे दहावे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. तर फुकेत नवव्या, पॅरिस आठव्या, हाँगकाँग सातव्या आणि न्यूयॉर्क सहाव्या स्थानावर आहे. मात्र, आपल्या देशातील पर्यटकांमध्ये दिल्ली आणि मुंबई हे सर्वात आवडीची शहरं आहेत जी संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Vastu Tips: धुतलेले कपडे 'या' दिशेला वाळत टाकले की, खेळ खल्लास...

हैदराबादने सहाव्या क्रमांकावर असून. जयपूर हे देखील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. सर्वेक्षण अहवालात गोवा, बंगळुरू आणि चेन्नई हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. तर अहमदाबाद हे आग्राला मागे टाकून पर्यटकांसाठी 10 वे सर्वात आवडते ठिकाण राहिले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT