धक्कादायक... कल्याणनंतर डोंबिवलीमध्ये कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू, महाराष्ट्रात पुन्हा कोव्हिडचं थैमान?
डोंबिवलीमध्ये एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने केडीएमसी प्रशासनाची चिंता वाढली आहे. कारण दोनच दिवसांपूर्वी कल्याणमध्ये देखील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

डोंबिवलीतील 67 वर्षीय रुग्णाचा कोव्हिडमुळे मृत्यू

कल्याण डोंबिवली आरोग्य विभागाने दिली माहिती

2 रुग्णांचा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू तर एक होम आयसोलेशन
डोंबिवली: कोरोनाने आता पुन्हा एकदा डोकेदुखी वाढवली आहे. कारण मागील काही दिवसांपासून एकीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आता मृतांचा आकडा देखील वाढत चालला आहे. दोनच दिवसांपूर्वी कल्याणामध्ये एका 47 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ज्यानंतर आज (28 मे) डोंबिवलीतील एका 67 वर्षीय व्यक्तीचाही कोव्हिडमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोव्हिडबाधित व्यक्तीवर ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू होते. अशी माहिती केडीएमसी आरोग्य विभागाच्या मुख्य अधिकारी डॉ. दिपा शुक्ला यांनी मुंबई तकशी बोलताना दिली आहे.
हे ही वाचा>> कल्याणमध्ये कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू, महाराष्ट्रात सापडले 'एवढे' रुग्ण
कल्याणनंतर डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णाचा मृत्यू
दोनच दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेतील एका 47 वर्षीय महिलेचा कोविडमुळे मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ आता डोंबिवलीमधील एका 67 वर्षीय पुरुषाचाही मृत्यू झाल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. विशेष म्हणजे कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्या या दोन्ही व्यक्तींना पूर्वीचे गंभीर आजार असल्याची माहितीही केडीएमसी आरोग्य विभागाने दिली आहे.
या 67 वर्षीय व्यक्तीला सहव्याधी म्हणजे हायपरटेन्शनचा व मधुमेहाचा त्रास होता. तसेच बारा वर्षांपूर्वी आलेल्या स्ट्रोकमुळे सदर व्यक्तीस पॅरालिसिसस झाला होता. या व्यक्तीचा मृत्यू 28 मे 2025 रोजी सायंकाळी कळवा हॉस्पिटल येथे झाला आहे. या व्यक्तीने कोविड लस घेतलेली नव्हती, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ल यांनी दिली आहे.
हे ही वाचा>> भाजप जिल्हाध्यक्षानं महिलेला मारली मिठी! Video व्हायरल होताच म्हणाला, "तिनेही माझा हात.."
तर केडीएमसी क्षेत्रातील दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि सध्या 3 कोविड रुग्ण आहे. 2 रुग्णांचा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे तर एक रुग्ण घरीच आयसोलेशनमध्ये आहे. अशी माहिती केडीएमसी आरोग्य विभागाच्या मुख्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली.
KDMC प्रशासन सतर्क
सध्याची परिस्थिती पाहता, केडीएमसी प्रशासन सतर्क झाले असून कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात 10 बेडचे आणि डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात 5 बेडचे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना घाबरून जाता, कोव्हिड काळात घेतलेल्या सर्व खबरदारी पुन्हा स्वीकारा आणि आवश्यक आरोग्य नियमांचे पालन करा असे आवाहन महापालिका अधिकाऱ्यांनी केले आहे.