Vastu Tips: धुतलेले कपडे 'या' दिशेला वाळत टाकले की, खेळ खल्लास...
vastu finance tips washing clothes and drying them in this direction causes financial loss and the person becomes a debtor
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वास्तुशास्त्रातील महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या
धुतलेले कपडे कोणत्या दिशेला वाळत घालावे?
चुकीच्या दिशेला कपडे वाळत घातले की होतं नुकसान
Vastu Finance: मुंबई: वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी या दिशेशी संबंधित असतात. आपण दैनंदिन जीवनात ज्या छोट्या-छोट्या गोष्टी करतो त्याचाही आपल्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक जीवनावर परिणाम होतो असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. अशीच एक छोटीशी गोष्ट आहे की, ज्याचा आपण विचारही केला नसेल पण तीच गोष्ट तुमच्या आर्थिक बाबींसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. ज्यावर तुमचं नफा किंवा नुकसान अवलंबून आहे. (vastu finance tips washing clothes and drying them in this direction causes financial loss and the person becomes a debtor)
आता ही छोटी गोष्ट म्हणजे धुतलेले कपडे जर आपण चुकीच्या दिशेला वाळविण्यासाठी टाकले तर तुमचं प्रचंड नुकसान होऊ शकतं असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. जाणून घेऊया त्याविषयी सविस्तरपणे.
हे ही वाचा>> Optical Illusion Test: बाई की पुरुष? फोटोत सर्वात आधी काय दिसलं? नीट उत्तर सांगा
कपडे धुतल्यानंतर ते योग्य दिशेने आणि योग्य वेळी वाळवावेत असे सांगितले आहे. असे म्हटले जाते की यासंबंधीचे नियम तोडल्याने घरात दारिद्र्य येतं.
कपडे नेमके कुठे सुकवायचे?
वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की, कपडे सुकवण्याची दोरी नेहमी पश्चिमेकडून उत्तरेकडे बांधावी. उत्तरेकडून पूर्वेकडे बांधू नका.









