सुखी संसाराचे सोनेरी स्वप्न, पण बायकोचा मोबाईल हाती घेतला अन् झोप उडाली
Crime News : तरुणाशी लग्न करून लुटेऱ्या नवरीने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, लग्नात भाऊ बनून आलेला तरुणच तिचा खरा पती असल्याचे निष्पन्न झाले आहे. नात्याचा गैरफायदा घेऊन लाखो रुपयांची लूट करण्याच्या बेतात असलेल्या सात जणांच्या टोळीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुखी संसाराचे सोनेरी स्वप्न
पण बायकोचा मोबाईल हाती घेतला अन् झोप उडाली
Crime News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणाला जाळ्यात ओढणाऱ्या आणि लग्नानंतर फसवणूक करणाऱ्या एका नवरीचा आणि तिच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. एका खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुणाला लग्नासाठी मुलगी शोधणे महागात पडले. मुलाच्या घरच्यांनी एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत मुलीचा फोटो पाहिला आणि संबंध निश्चित केले. लग्नाच्या तयारीसाठी मुलाने जबलपुरवरून गावी धाव घेतली, परंतु त्याला याची पुसटशीही कल्पना नव्हती की, ज्या नवरीशी तो लग्न करत आहे, ती केवळ सोन्या-नाण्यांच्या आणि रोख रकमेच्या लोभापायी हे नाटक करत आहे. या टोळीने हिंदू रितीरिवाजांचा आधार घेऊन अत्यंत पद्धतशीरपणे 7 लाख रुपयांचा खर्च करून हा विवाह सोहळा पार पाडला.
हेही वाचा : महागाईचा भडका, 10 दिवसात पेट्रोल-डिझेल 7 रुपयांनी महागलं; पाहा लेटेस्ट किंमती
व्हॉट्सॲप चॅटमुळे उघड झाले षड्यंत्र आणि नवरीचे खरे रूप
लग्नानंतर काही दिवसातच नवरीचे वागणे बदलले आणि ती सतत मोबाईलवर कुणाशी तरी चॅटिंग करू लागली. पतीला संशय आल्याने त्याने एक दिवस नवरीचा मोबाईल तपासला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. व्हॉट्सॲप चॅटमध्ये धक्कादायक माहिती समोर आली की, ज्या तरुणाने लग्नात 'भाऊ' बनून कन्यादान करण्याची रीत पार पाडली होती, तो दुसरा कोणी नसून त्या नवरीचा खरा पती आहे. दोघांनी 2024 मध्येच आग्रा येथील आर्य समाज मंदिरात प्रेमविवाह केला होता. या टोळीने सुनियोजितपणे लग्नाचे नाटक रचून मुलाच्या घरातील लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लुटण्याचा डाव आखला होता. लग्नानंतर नवरीने पतीसोबतचे नाते केवळ दिखाव्यासाठी ठेवले होते, हे सत्य समोर येताच मुलाच्या कुटुंबीयांनी तत्काळ नवरीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
हेही वाचा : कवटी फोडली, फुप्फुसात घुसल्या बरगड्या; राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटूला कुणी संपवले?









