विषय हार्डच... पहिला Job सोडला अन् मिळाली 39 लाखांची Hike.. पठ्ठ्याने केलं तरी काय?
दिल्लीच्या एका युवकाला पहिली नोकरी सोडल्यानंतर थेट 39 लाखांची हाइक मिळाल्याची बातमी समोर आली आहे. त्याने पहिली नोकरी सोडल्यानंतर 45 लाख रुपये वार्षिक CTC ची नोकरी मिळाल्याचा दावा केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दिल्लीच्या युवकाला मिळाली नोकरीत 39 लाखांची Hike
पहिली नोकरी सोडल्यानंतर थेट 45 लाखांच्या पगाराची ऑफर
दिल्लीच्या युवकाचा तरुणांना सल्ला
Delhi Salary Hike News: दिल्लीच्या एका युवकाने पहिली नोकरी सोडल्यानंतर 45 लाख रुपये वार्षिक CTC ची नोकरी मिळाल्याचा दावा केला आहे. या युवकाने फक्त 1 वर्ष पहिली नोकरी केली आणि त्याला ही नोकरी सोडल्यानंतर थेट 39 लाखांची हाइक मिळाल्याचं त्यानं सांगितलं. आता IBM मध्ये त्याच्या सध्याच्या नोकरीतील वार्षिक पगार 5.5 लाख रुपये असल्याचं सांगितलं जातंय.
दिल्लीच्या या युवकाला वार्षिक 45 लाख रुपये पगार असलेल्या नोकरीची ऑफर मिळाल्यानंतर अनेकांनी त्याच्याकडे काही टिप्स मागितल्या आहेत. एक नोकरी बदलल्यानंतर वार्षिक 39.5 लाख रुपयांची हाइक मिळू शकते, यावर लोकांचा विश्वासच बसत नाहीये.
आधी IBM मध्ये केली नोकरी
याआधी IBM मध्ये नोकरी करणाऱ्या दिल्लीच्या या युवकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याला वार्षिक 45 लाख रुपये पॅकेजच्या नोकरीचा प्रस्ताव मिळाल्याचा दावा केला आहे. याआधी त्याने आयबीएम कंपनीत वार्षिक 5.5 लाख रुपयांच्या पॅकेजपासून आपल्या करिअरची सुरूवात केली होती.
इतकी मोठी हाइक मिळाल्याने लोक चकित!
एका वर्षभरातच पगारात इतकी मोठी वाढ झाल्याचं ऐकून लोक चकित झाले आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करणाऱ्या देवेशच्या X वरील पोस्टने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. त्याच्या पोस्टमध्ये त्याने म्हटले की, "मी गेल्या वर्षी आयबीएममध्ये माझ्या करिअरची सुरुवात फक्त 5.5 लाख रुपयांच्या वार्षिक सीटीसीने केली होती आणि आता एका वर्षाच्या आत माझ्याकडे वार्षिक 45 लाख रुपयांपेक्षा जास्त सीटीसीची ऑफर आहे."










