Govt Job: अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरीची मोठी संधी; पगाराचा आकडा तर पाहा...
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) कडून अभियांत्रिकी क्षेत्रात डिग्री असलेल्या तरुणांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 20 मे 2025 रोजी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी 4 जून 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

BEL मार्फत इंजीनियरिंगच्या तरुणांसाठी मोठी भरती

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी

किती मिळेल पगार?
BEL Recruitment 2025: इंजिनीयरिंग म्हणजेच अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेले तरुण नोकरीच्या शोधात असल्याचं पाहायला मिळतं. अशा तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी मिळवून देणारी बातमी समोर आली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) कडून अभियांत्रिकी क्षेत्रात डिग्री असलेल्या तरुणांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 20 मे 2025 रोजी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी 4 जून 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
किती रिक्त जागांसाठी भरती?
या भरतीच्या माध्यमातून एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
काय आहे पात्रता?
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात BE किंवा B.Tech डिग्री असणं आवश्यक आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून ही डिग्री घेतलेली असावी.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करण्यासाठी कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तसेच एससी (SC), एसटी (ST), ओबीसी (OBC) आणि पीडब्ल्यूडी (PWD) उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
हे ही वाचा: 22 वा मजला, तरूणीची उडी आणि बॉडीचे दोन तुकडे... मुंबईतील विक्रोळीत नेमकं काय घडलं?
किती असेल पगार?
प्रोजेक्ट इंजीनियर-1: 40,000 रुपये मासिक
प्रोजेक्ट इंजीनियर-2: 45,000 रुपये मासिक
प्रोजेक्ट इंजीनियर-3: 50,000 रुपये मासिक
प्रोजेक्ट इंजीनियर-4: 55,000 रुपये मासिक
कशी होईल निवड?
यामध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल. आधी लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि यामध्ये उत्तीर्ण उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. यानंतर मेरिटच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटच्या साहाय्याने माहिती मिळवू शकतात.
हे ही वाचा: व्हिडिओ कॉल कर नाहीतर तुला...शिक्षकाने विद्यार्थीनीला दिली धमकी
कसा कराल अर्ज?
1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम bel-india.in या BEL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. यानंतर होम पेजवरील 'Recruitment' सेक्शनमध्ये जा.
3. संबंधित भरतीची लिंक उघडा आणि त्यामध्ये दिले गेलेले गाइडलाइन्स वाचा.
4. आता ऑनलाइन अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
5. यानंतर, आवश्यक डिटेल्स भरून दस्तऐवज अपलोड करा.
6. अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाचं शुल्क भरून घ्या.
7. आता भरलेला अर्ज सबमिट करा.
8. शेवटी उमेदवारांनी अर्जाची प्रिंट काढून ती स्वत:कडे सुरक्षित ठेवा.