तरुणाने साडी नेसली, कपाळावर सिंदूर लावलं अन् जीवन संपवलं! मृत्यूमागे बहिणीचं मोठं कनेक्शन

मुंबई तक

Shocking Viral News : उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अतर्रा कोतवाली परिसरात गांधी नगरमध्ये राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणाला बहिणीच्या मृत्यूचा धक्का बसला

ADVERTISEMENT

Shocking Viral News
Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बहिणीच्या मृत्यूमुळे तरुणाला बसला मोठा धक्का

point

भावाच्या लग्नादिवशीच उचचलं टोकाचं पाऊल

point

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

Shocking Viral News : उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अतर्रा कोतवाली परिसरात गांधी नगरमध्ये राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणाला बहिणीच्या मृत्यूचा धक्का बसला. या धक्क्यातून तो सावरला नाही. त्यामुळे या तरुणाने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. संजय असं या मृत तरुणाचं नाव आहे. संजयने सर्वात आधी बहिणीची साडी नेसली, सोन्याचे दागिने घातले आणि कपाळावर सिंदूर लावून गळफास घेत आयुष्य संपवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत संजय ITI चा विद्यार्थी होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची मानसिक स्थिती खालावली होती. 2013 मध्ये त्याच्या बहिणीचं लग्न झालं होतं. परंतु, आगीत जळून तिचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळं संजयला मोठा धक्का बसला होता. तो बहिणीला स्वप्नात पाहायचा आणि तिच्याशी बोलायचा. बहिणीच्या मृत्यूनंतरच तो डिप्रेशनमध्ये गेला होता, असं त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. 

हे ही वाचा >> Maharashtra Monsoon: केरळमधून अवघ्या 24 तासात मान्सून महाराष्ट्रात? 35 वर्षात पहिल्यांदाच असं कसं घडलं?

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

संजयचा मोठा भाऊ धर्मेंद्रचं लग्न 23 मे रोजी होणार होतं. संपूर्ण कुटुंब लग्नाच्या कार्यक्रमात गेलं होतं. संजय घरीच होता. लग्नाची वरात निघाल्यानंतर धर्मेंद्रने संजयला फोन केला. पण संजयकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

डीएसपी प्रवीण कुमार यांनी दिलेली माहिती अशी की, गांधी नगर परिसरात घडलेल्या घटनेबद्दल माहित झालं. या परिसरात एका घरातून दुर्गंधी येत होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले आमि टाळा तोडून रुममध्ये प्रवेश केला. त्यानंतर संजयने एका महिलेची साडी, बिंदी, बांगड्या, सिंदूर घालून गळफास घेतल्याचं दिसलं. फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला. या घटनेबाबत सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. 

हे ही वाचा >> दुसरी मुलगी झाली...सासरच्या लोकांनी सुनेचा केला प्रचंड छळ, महिला आरोग्य अधिकाऱ्याने जीवन संपवलं!

हे वाचलं का?

    follow whatsapp