गाडी धडकली म्हणून खाली उतरले, पण मागून येणाऱ्या ट्रकने... बीडमध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू
Beed Car Accident: हा अपघात इतका भयानक होता की, सर्व 6 जणांचे मृतदेह महामार्गावर छिन्नविछिन्नावस्थेत पडलेले होते. मृतांची एवढी दुरावस्था झालेली होती, की स्थानिक लोकांना इच्छा असूनही ते उचलता येत नव्हते. जवळपास 100-200 फूट परिसरात हे सगले मृतदेह फेकले गेले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बीडमध्ये धुळे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात

अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू
Beed Crime News: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराईजवळील गढी पुलावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने गेवराई परिसरात शोककळा पसरली आहे.
कसा झाला अपघात?
गढी पुलावर एका एसयूव्ही वाहनाचा डिव्हायडरवर धडकून किरकोळ अपघात झाला होता. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. वाहन डिव्हायडरमध्ये अडकल्याने गाडीतील सर्व प्रवासी बाहेर उतरले आणि गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. याचवेळी महामार्गावरून भरधाव येणाऱ्या एका ट्रकने या सहा जणांना चिरडले. या भीषण अपघातात बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा >> भाजपच्या माजी आमदाराचा लातूरमध्ये भीषण अपघातात जागीच मृत्यू!
हा अपघात इतका भयानक होता की, सर्व 6 जणांचे मृतदेह महामार्गावर छिन्नविछिन्नावस्थेत पडलेले होते. मृतांची एवढी दुरावस्था झालेली होती, की स्थानिक लोकांना इच्छा असूनही ते उचलता येत नव्हते. जवळपास 100-200 फूट परिसरात हे सगले मृतदेह फेकले गेले होते.
घटनास्थळीच सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे गेवराई शहरात हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.