भाजपच्या माजी आमदाराचा लातूरमध्ये भीषण अपघातात जागीच मृत्यू!
भाजपाचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे लातूर जिल्ह्यातील औसा रोडवर बेलकुंडी गावाजवळ एका भीषण कार अपघातात निधन झालं आहे.
ADVERTISEMENT

लातूर: बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश तुकाराम देशमुख उर्फ आर. टी. देशमुख (जीजा) यांचे लातूर जिल्ह्यातील औसा रोडवर बेलकुंडी गावाजवळ आज (26 मे) दुपारी साडेपाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले.
प्राथमिक माहितीनुसार, आर. टी. देशमुख हे चारचाकी वाहनातून औसाकडे जात असताना त्यांच्या गाडीवरील चालकाचे उड्डाणपुलावर नियंत्रण सुटले, त्यामुळे गाडीने दुभाजकाचे कठडे तोडत काठावर उलट्या घेतल्या. अपघात इतका गंभीर होता की, गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

हे ही वाचा>> दहावीत 96 टक्के पडलेल्या विद्यार्थीनीने स्वत:ला संपवलं, परीक्षा सुरू असताना वसतिगृहात स्कार्फने...
अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ मदत केली आणि जखमींना बाहेर काढले. मात्र रुग्णालयात नेण्याआधीच देशमुख यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या गाडीचा क्रमांक MH 44 AD 2797 असून गाडीतील चालकही गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे बीड आणि लातूर जिल्ह्यात तसेच राज्याच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.










