दहावीत 96 टक्के पडलेल्या विद्यार्थीनीने स्वत:ला संपवलं, परीक्षा सुरू असताना वसतिगृहात स्कार्फने...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सेमिस्टरची परीक्षा सुरू होती. त्या परीक्षेचा शेवटचा पेपर मंगळवारी (20 मे) रोजी होता. दुपारी 2 ते 5 या वेळेत हा पेपर होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लातूरमध्ये पॉलिटेक्निकला शिकणाऱ्या विद्यार्थीनीची आत्महत्या

परीक्षा सुरू असतानाच वसतिगृहात जाऊन स्वत:ला संपवलं

विद्यार्थीनीने टोकाचं पाऊल का उचललं?
Latur News : गेल्या काही दिवसांपूर्वीच दहावीच्या निकालामुळे राज्यात लातूर चर्तेक आलं होतं. मात्र त्यानंतर आता लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील सरकारी महिला पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीने मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितलं की, ही मुलगी पहिल्या वर्षाच्या डिप्लोमाची विद्यार्थिनी होती. ती नांदेड जिल्ह्यातील मांग्याळ गावची रहिवासी होती. परीक्षेच्या शेवटच्या दिवशीच तिने कॉलेजच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.
तिकडे पेपर सुरू, इकडे विद्यार्थीनीची आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजमध्ये सेमिस्टरची परीक्षा सुरू होती. त्या परीक्षेचा शेवटचा पेपर मंगळवारी (20 मे) रोजी होता. दुपारी 2 ते 5 या वेळेत हा पेपर होता. पण परीक्षेच्या वेळी ही विद्यार्थीनी वसतिगृहात परतली आणि तिच्या खोलीत गेली. तिथेच तिने स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली.
विद्यार्थीनींनी खिडकीतून पाहिल्यावर काय दिसलं?
परीक्षा संपल्यानंतर इतर मुली वसतिगृहात परतल्या, तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्यांनी तिच्या खोलीचा दरवाजा वाजवला, पण तिने दरवाजा उघडलाच नाही. पण तरूणीकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकीतून पाहिलं, तेव्हा त्यांना ती फासावर लटकलेली दिसली. विद्यार्थीनींनी लगेचच वसतिगृह प्रशासनाला कळवत पोलिसांना बोलावलं.
हे ही वाचा >> कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जण ठार, ढिगाऱ्याखाली दबलेले अनेकजण गंभीर, कशी घडली घटना?
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी लातूरच्या सरकारी रुग्णालयात पाठवला. परीक्षेच्या ताणामुळे मुलीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तरीही पोलिसांनी इतर कारणं शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा >> नुसता व्हिडिओ कॉल नाही, आता 3D व्हिडिओ कॉल करा! गूगलचं भन्नाट AI फिचर
विद्यार्थीनीच्या पालकांच्या जबाबानंतर पुढचं चित्र स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं. महाविद्यालयाचे कार्यवाहक प्राचार्य सूर्यकांत राठोड म्हणाले, महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी मला विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. विद्यार्थीनीच्या पहिल्या सेमिस्टरचे काही विषय राहिलेले (बॅक) होते. दरम्यान, शैक्षणिक नोंदींनुसार, मृत विद्यार्थानी ही एक हुशार विद्यार्थिनी होती. तिने दहावीच्या बोर्ड परीक्षेत 96 टक्के गुण मिळवले होते.