व्हिडिओ कॉल कर नाहीतर तुला...शिक्षकाने विद्यार्थीनीला दिली धमकी

मुंबई तक

Crime News : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये सर्कुलर रोडवरील चौधरी छोटू राम पदवी महाविद्यालयात धक्कादायक घटना घडली. शिक्षकानेच विद्यार्थीनीला व्हिडिओ कॉल करुन कपडे काढण्यास जबरदस्ती केली आहे. जर तिने असे केले न केल्यास तिला परिक्षेत नापास करण्याची धमकी देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Crime News Professor Say Her Students For Video Call And pressurised Remove Her Clothes
Crime News Professor Say Her Students For Video Call And pressurised Remove Her Clothes
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये घडली धक्कादायक घटना

point

शिक्षक आणि विद्यार्थीच्या नात्याला काळीमा फासणारं कृत्य आलं समोर

Crime News : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये सर्कुलर रोडवरील चौधरी छोटू राम पदवी महाविद्यालयात धक्कादायक घटना घडली. बीएससीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने महाविद्यालयातील शिक्षक दुष्यंत कुमार यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. शिक्षक विद्यार्थीनीची छेड काढतात, अश्लील कृत्यही करतात. जेव्हा पीडित विद्यार्थीनी शिक्षकाच्या कृत्याला विरोध करते तेव्हा तो शिक्षक विद्यार्थीनीला नापास करेल अशी धमकी देतो. या घटनेचा खुलासा आता समोर आला आहे. 

हेही वाचा : कल्याणमध्ये कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू, महाराष्ट्रात सापडले 'एवढे' रुग्ण

पीडित विद्यार्थीनीने आरोप केला की, शिक्षकाने तिच्यासोबत अनेकदा अश्लील चाळे केले आहेत. बऱ्यादचा माझ्यासोबत अश्लील भाषेत बोलतात. रात्री फोन करतात आणि  कपडे काढण्यासाठी दबाव आणला जातो. पीडितेचं म्हणणं आहे की, शिक्षकाने रात्रीच्या वेळी फोन केला होता. पण पीडितेनं शिक्षकाच्या फोनला प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर शिक्षक तिला शाळेतील मार्क्स कमी करेन अशी धमकी देतात. 
 
अशावेळी पीडित महिला म्हणाली की, तिचे शेवटचे वर्ष असल्याने तिनं हे सर्व सहन केलं. पण तिच्या शिक्षकांच्या वाईट कृतीत वाढ होत आहे. पीडित विद्यार्थीनी म्हणाली की, तिला अनेकदा व्हिडिओ कॉल करुन कपडे काढण्यास सांगितलं. अशातच आता पीडित विद्यार्थीनीने प्राध्यापकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

दरम्यान, एका जाट महासभेमध्ये पीडित विद्यार्थीनी पोहोचली आणि तिनं या घटनेविरोधात आवाज उठवला. अशातच घटनास्थळी पोलिसांना धाव घेतली. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. महाविद्यालयाच्या प्रशासनाने आरोपीविरोधात तपास करण्यास सांगितला आहे. 

हेही वाचा : Maharashtra Monsoon: केरळमधून अवघ्या 24 तासात मान्सून महाराष्ट्रात? 35 वर्षात पहिल्यांदाच असं कसं घडलं?

मुझफ्फरनगरातील पोलिसांनी सांगितलं की, ही घटना छोटू राम पदवी विद्यालयात घडली आहे. विद्यार्थीनीने नराधमी शिक्षकाच्या विरोधात अनेक आरोप लावले आहेत. अशातच आता आरोपी शिक्षकाविरोधात तपास सुरु करण्यात आला आहे. पोलीस संबंधित प्रकरणात पुढील तपास करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp