मुंबईला आजही पाऊस झोडपणार? जाणून घ्या मुंबई, ठाणे, पालघरमध्ये कसं असेल हवामान?

मुंबई तक

Mumbai Rain Alert: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3-4 तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याची आणि वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Mumbai Weather Alert: मुंबई आणि आसपासच्या परिसरात आज (मंगळवार) हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, काही ठिकाणी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा >> छत्रपती संभाजीनगरमध्ये एन्काऊंटर! पोलिसांच्या चकमकीत ठार झालेला खोतकर कोण?

सकाळपासूनच मुंबईत काही भागात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मरीन ड्राइव्हसह दक्षिण मुंबईत सकाळी हलक्या सरी दिसून येतील. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आजचे तापमान किमान 26 आणि कमाल 30 डिग्री सेल्सियसपर्यंत राहील. 

ठाणे,मुंबई, पालघरमध्ये जोरदार पावसाची शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3-4 तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याची आणि वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे. गेल्या 24 तासांत कोलाबा येथे 71.9 मिमी आणि सांताक्रूझ येथे 17.5.मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हे ही वाचा >> गाडी धडकली म्हणून खाली उतरले, पण मागून येणाऱ्या ट्रकने... बीडमध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू

मुंबई महानगरपालिका (BMC) आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. कमी दृश्यमानतेमुळे वाहनचालकांना सावधपणे वाहन चालवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, समुद्रकिनारी जाणे टाळावे आणि पाणी साचणाऱ्या भागात सावधगिरी बाळगावी, असे प्रशासनाने सुचवले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp