'पप्पा टेन्शन नका घेऊ, जज साहेबांनी माझ्यासाठी...'; कोर्टात हजर होण्यापूर्वी ज्योती मल्होत्राने वडिलांना काय सांगितलं?
Jyoti Malhotra Latest News : हरियाणाच्या हिसारमध्ये राहणारी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योतीची अनेक राज्यातील पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ज्योती मल्होत्राबाबत धक्कादायक माहिती समोर

ज्योतीने वडिलांसोबत केली महत्त्वाची चर्चा

ज्योतीने तिचे वडील हरीश मल्होत्रा यांना काय सांगितलं?
Jyoti Malhotra Latest News : हरियाणाच्या हिसारमध्ये राहणारी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योतीची अनेक राज्यातील पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा चौकशी करत आहेत. आज 26 मे रोजी तिची पोलीस कोठडी संपत आहे. दरम्यान, ज्योतीला कडक पोलीस बंदोबस्तात हिसार कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
अनेक राज्यातील पोलिसांनी केली चौकशी
ज्योतीन ज्या ज्या ठिकाणी व्हिडीओ शूट करून यूट्यूबवर अपलोड केलाय, त्या ठिकाणांची माहिती घेण्यासाठी गोवा, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचे पोलीस हिसारला पोहोचले. पोलिसांनी व्हिडीओ शूट करण्याचा हेतू आणि ते शेअर का करण्यात आले, याबाबत माहिती गोळा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्योतीच्या मोबाईलमधून डिलीट केलेल्या डेटामधून फॉरेन्सिक डिपार्टमेंटला महत्त्वाची माहिती मिळाली आहे. यामध्ये पाकिस्तानी एजन्सी (PIOS) सोबत संपर्क केल्याचं संशय आहे.
हे ही वाचा >> पहिल्याच पावसाने मुंबईला झोडपलं, प्रवाशांची उडाली दाणादाण, फोटो आले समोर
पाकिस्तानी एम्बेसीच्या अधिकाऱ्यांना संपर्क
पोलिसांना ज्योतीच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या कॉल डिटेल्समध्ये दिल्लीत पाकिस्तानी एम्बेसीचे अधिकारी दानिश आणि काही PIOS सोबत चर्चा केल्याचा पुरावा मिळाला आहे. त्यांच्या लॅपटॉपमधून खास डेटा मिळाला नाहीय. ज्योतीचे तीन मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप फॉरेन्सिक तपासासाठी मधुबन, करनालला पाठवले आहेत.
कोर्टाच हजेरी, रिमांडवर सस्पेंस
22 मे रोजी कोर्टाने ज्योतीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज तिला तिसऱ्यांदा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पोलीस कोठडी आणखी वाढवण्यात यावी की नाही, याचा निर्णय कोर्टात होणार आहे. तत्पूर्वी, ज्योतीने तिचे वडील हरीष मल्होत्रा यांच्यासोबत काही मिनिटे चर्चा केली. ज्योती वडिलांना म्हणाली, पप्पा टेन्शन घेऊ नका. जज साहेबांनी माझ्यासाठी वकिलाची व्यवस्था केली आहे. पोलिसांनी ज्योतीच्या वडिलांना कोर्टात येण्याची परवानगी दिली आहे.