पहिल्याच पावसाने मुंबईकरांना हादरवून टाकलं, धडकी भरवणारे 'ते' 5 फोटो

मुंबई तक

Monsoon Rain Update : पहिल्याच पावसात मुंबईत काही भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुंबईकरांची दानादान उडाली आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलेलं आहे. त्याचे काही फोटोज् शेअर केलेले आहेत.

ADVERTISEMENT

social share
google news
Mumbai Rain

1/5

राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही वेळ मुंबईकरांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
 

Mumbai Rain

2/5

मुंबईतील दादर हिंदमाता, परळसारख्या भागात पावसाचं पाणी रस्त्यावर साचलं असून नद्यांचं स्वरुप प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांना याचा सामना करावा लागत आहे. या पहिल्याच मुसळधार पावसामध्ये मुंबईची तुंबई झाली आहे. 
 

Mumbai Rain

3/5

मुंबईत मध्यरात्रीपासून पाऊस सुरु असून, अद्यापही थांबायचं नाव घेत नाही. रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. यामुळे आता मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे.

Mumbai Rain

4/5

रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली आहे. तर काही वाहन चालकांना रस्त्यावरील साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती पाहता मुंबई ट्राफिक पोलीस आपली भूमिका पार पाडत आहेत. 
 

Mumbai Rain

5/5

पुढील काही तास हे मुंबईकरांसाठी फार महत्वाचे असणार आहेत. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे मुंबईकरांची वाहनं काही ठिकाणी बंद पडल्याचं दिसून येत आहे. 
 

रिलेटेड चित्र गॅलरी

follow whatsapp