Monsoon Update: एवढ्या वर्षात कधीही झालं नाही.. ते यंदा घडलं, 'ही' आकडेवारी पाहून तुम्हीही...

मुंबई तक

यंदा तब्बल 16 वर्षानंतर पहिल्यांदाच मान्सून भारतात लवकर आला आहे. 2009 नंतर एवढ्या लवकर मान्सून भारतात कधीच आला नव्हता.

ADVERTISEMENT

2025 मध्ये मान्सूनची भारतात लवकर एंट्री (फोटो सौजन्य: PTI)
2025 मध्ये मान्सूनची भारतात लवकर एंट्री (फोटो सौजन्य: PTI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दक्षिण-पश्चिम मान्सून केरळमध्ये 8 दिवस आधीच दाखल

point

2025 मध्ये मान्सूनची भारतात लवकर एंट्री

point

16 वर्षानंतर पहिल्यांदाच मान्सून भारतात मे महिन्यात दाखल झाला

मुंबई: भारताच्या हवामान खात्याने (IMD) जाहीर केले आहे की, यंदा दक्षिण-पश्चिम मान्सूनने केरळमध्ये 24 मे 2025 रोजी प्रवेश केला आहे. सामान्यपणे 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो, परंतु यंदा तो तब्बल 8 दिवस आधीच आला आहे. 2009 नंतरची ही सर्वात लवकर मान्सूनाची सुरुवात आहे. 2009 मध्ये मान्सून 23 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता, अशी माहिती IMD ने दिली आहे.

एवढंच नव्हे तर महाराष्ट्रात देखील मान्सूनची ऐतिहासिक एंट्री झाली आहे. केरळवरून मान्सून अवघ्या 24 तासात महाराष्ट्रात पोहचला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील मान्सूनने अनेक वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Monsoon: केरळमधून अवघ्या 24 तासात मान्सून महाराष्ट्रात? 35 वर्षात पहिल्यांदाच असं कसं घडलं?

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 16 वर्षांतील (2009-2024) मान्सूनाच्या भारतातील आगमनाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:

भारतात कोणत्या वर्षी किती तारखेला आला मान्सून?

  1. 2009: 23 मे  
  2. 2010: 31 मे  
  3. 2011: 29 मे  
  4. 2012: 5 जून  
  5. 2013: 1 जून  
  6. 2014: 6 जून  
  7. 2015: 5 जून  
  8. 2016: 8 जून  
  9. 2017: 30 मे  
  10. 2018: 29 मे  
  11. 2019: 8 जून  
  12. 2020: 1 जून  
  13. 2021: 3 जून  
  14. 2022: 29 मे  
  15. 2023: 8 जून  
  16. 2024: 30 मे

यंदा, 2025 मध्ये, मान्सून 24 मे रोजी दाखल झाला असून, 2009 नंतरची ही सर्वात लवकर सुरुवात आहे. हवामान खात्याने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

हे ही वाचा>> पहिल्याच पावसाने मुंबईला झोडपलं, प्रवाशांची उडाली दाणादाण, फोटो आले समोर

मान्सूनच्या लवकर आगमनामुळे केरळसह दक्षिण भारतातील शेती आणि पाणीपुरवठ्यावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. तथापि, काही तज्ज्ञांनी हे लवकर आगमन हवामान बदलाशी (Global Warming) जोडले आहे, असेही मत व्यक्त केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती आणि पुढील अंदाज लवकरच जाहीर केले जातील, असे IMD ने सांगितले.

मान्सूनचा महाराष्ट्राच्या दिशेने अत्यंत जलद प्रवास

हवामान खात्याच्या अहवालानुसार, यंदा अरबी समुद्रातील अनुकूल चक्रीय वातावरण आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा  यामुळे मान्सूनसाठी अत्यंत पोषक वातावरण झालं आणि त्याला प्रचंड गती मिळाली. त्यामुळे केरळमध्ये 1 जून ऐवजी 24 मे रोजीच मान्सून दाखल झाला. पण त्यानंतर जे झालं त्यामुळे अवघा महाराष्ट्र चक्रावून गेला आहे. 

कारण अवघ्या 24 तासात मान्सून हा केरळहून महाराष्ट्रात दाखल झाला. सध्या मान्सून  तळकोकणात पोहोचला आहे. जो आता लवकरच उर्वरित महाराष्ट्रात पोहचेल. हवामान तज्ज्ञांच्या मते, 5 जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकण आणि गोव्यात स्थिर होईल, तर 15 जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल.

हे वाचलं का?

    follow whatsapp