22 वा मजला, तरूणीची उडी आणि बॉडीचे दोन तुकडे... मुंबईतील विक्रोळीत नेमकं काय घडलं?
ही घटना सोमवारी (२६ मे) रात्री घडली. स्थानिकांच्या माहितीनुसार, सदर तरुणीने इमारतीच्या 22 व्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारली.
ADVERTISEMENT

मुंबई : विक्रोळीतील कन्नमवार नगर परिसरातील इमारत क्रमांक 97 मध्ये राहणाऱ्या एका तरुणीने 22 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा >> मुंबईला आजही पाऊस झोडपणार? जाणून घ्या मुंबई, ठाणे, पालघरमध्ये कसं असेल हवामान?
ही घटना सोमवारी (२६ मे) रात्री घडली. स्थानिकांच्या माहितीनुसार, सदर तरुणीने इमारतीच्या 22 व्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारली. उंचावरून पडल्याने तिचे शरीर दोन भागांत तुटले आणि तिचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी तात्काळ विक्रोळी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.
हे ही वाचा >> छत्रपती संभाजीनगरमध्ये एन्काऊंटर! पोलिसांच्या चकमकीत ठार झालेला खोतकर कोण?
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे. वैयक्तिक कारण, मानसिक तणाव किंवा अन्य कोणते कारण यामागे आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.