बापरे.. ज्योती मल्होत्राची व्हायची ISI सोबत थेट चर्चा, हादरवून टाकणारे पुरावेच...
Jyoti Malhotra Latest News : भारताची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या ISI साठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटकेत आहे. ज्योती मल्होत्राला हिसारच्या एका न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ज्योती मल्होत्राबाबत धक्कादायक माहिती समोर

ज्योतीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पोलिसांना सापडले खूप महत्त्वाचे पुरावे
Jyoti Malhotra Latest News : भारताची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या ISI साठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटकेत आहे. ज्योती मल्होत्राला हिसारच्या एका न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हिसार पोलिसांनी ज्योतीकडे असणारे डिवाईस आणि डिजिटल अकाऊंट्समधून 12 टेराबाईट्स फॉरेन्सिक डेटा हस्तगत केला आहे. यामधून अनेक खुलासे समोर आले आहेत.
हा डिजिटल डेटा ज्योतीचे पाकिस्तानशी जोडलेले कनेक्शन आणि नरेटिव्ह पूश अभियानाला जागृत करतं. 12 टेराबाईट्सच्या डेटामध्ये चॅट रिकॉर्ड्स, कॉल लॉग्स, व्हिडीओ फुटेज, आर्थिक व्यवहार आणि अन्य माहिती आहे. यामुळे पोलिसांना पुढील तपासात मदत होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रकरणांमध्ये असे डिजिटल फॉरेन्सिक डेटा खूप महत्त्वाचे मानले जातात. याच्या मदतीने तपास एजन्सींना संपूर्ण टाईमलाईनबद्दल माहिती पडतं. नेटवर्कबाबतही माहिती मिळते.
हे ही वाचा >> Monsoon Update: एवढ्या वर्षात कधीही झालं नाही.. ते यंदा घडलं, 'ही' आकडेवारी पाहून तुम्हीही...
ISI सोबत जोडलेल्या PIOS शी मल्होत्राचा थेट संपर्क
सूत्रांच्या माहितीनुसार, ज्योती ISI सोबत जोडलेल्या पाकिस्तानी लोकांच्या थेट संपर्कात होती. या माध्यामातून ज्योतीने पाकिस्तानच्या लोकांशी वन टू वन केलं. ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा डिजिटल डेटा ट्रेस होऊ नये.
पाकिस्तानकडून व्हिआयपी ट्रीटमेंट आणि स्पेशल व्हिसा
पाकिस्तानकडून ज्योतीला व्हिआयपी ट्रीटमेंट देण्यात आली होती. पाकिस्तानने तिला विशेष व्हिसा आमि सुरक्षा दिली होती. अशी सुरक्षा जी परदेशी पत्रकारांनाही सामान्यपणे मिळत नाही. पाकिस्तानला ज्योतीला एक अॅसेट म्हणून वापरत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, जे काही डिजिटल पुरावे मिळाले आहेत, ते ज्योतीला शिक्षा मिळण्यास पुरेसे आहेत. ज्योतीने राष्ट्रविरोधी काम केलं आहे. ज्योतीने केलेल्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी होत आहे. ज्योतीला फंडिंग कुठून मिळाली आणि यामागचा उद्देश काय होता, याचा आता तपास घेतला जाणार आहे.