मान्सून मुंबईत दाखल, नेहमीपेक्षा तब्बल 12 दिवस लवकर, हवामान खात्याने काय म्हटलं?

मुंबई तक

रविवारी (25 मे) केरळमध्ये मान्सूनने प्रवेश केल्यानंतर अवघ्या 24 तासांत तो महाराष्ट्रातील तळकोकणात पोहोचला होता. आज सकाळपासून मुंबई, ठाणे आणि उपनगर परिसरात ढगाळ वातावरणासह तुरळक ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Mumbai Monsoon Update : मुंबईकरांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. नैऋत्य मान्सून 2025 ने आज, 26 मे 2025 रोजी मुंबईत हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) याबाबत अधिकृत घोषणा केली. यंदा मान्सून तब्बल 12 दिवस आधीच महाराष्ट्रात धडकल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा >> पंढरपुरात भीमा नदीला पूर, मंदिरात पूजेसाठी गेलेले साधू अडकलेले, बचावकार्य सुरू

रविवारी (25 मे) केरळमध्ये मान्सूनने प्रवेश केल्यानंतर अवघ्या 24 तासांत तो महाराष्ट्रातील तळकोकणात पोहोचला होता. आज सकाळपासून मुंबई, ठाणे आणि उपनगर परिसरात ढगाळ वातावरणासह तुरळक ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. विशेषत: लालबाग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बांद्रा बँडस्टँड आणि नवी मुंबईतील नेरूळ, खारघर यांसारख्या भागात पावसाने जोर धरला आहे.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp