Weather Update: वादळ सुस्साट.. पुढचे 4 दिवस महाराष्ट्रात धुमाकूळ
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ लागलं आहे. त्यामुळे पुढचे 4 दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागात आपण पावसाचा धुमाकूळ पाहतोय. पुढचे काही दिवस असाच पाऊस कोळसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे. राज्यात यंदा मान्सूनचं आगमन सुद्धा लवकर झालं आहे. त्यामुळे यंदा मे महिन्यातच महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस अनुभवायला मिळतो आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढचे 4 दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, येत्या काही तासात कोकण, मध्य महाराष्ट्र म्हणजे पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता कोकण आणि घाटमाथ्यावर जास्त वर्तवण्यात आली आहे.
हे ही वाचा>> कल्याणमध्ये कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू, महाराष्ट्रात सापडले 'एवढे' रुग्ण
LPC म्हणजे कमी दाबाचे क्षेत्राबाबतच अपडेट समजून घेऊया
कमी दाबाचे क्षेत्र हे पुढे जाऊन चक्रीवादळात रुपांतर होऊ शकतं. आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ लागलं आहे. पुढील 4-5 दिवसांत याचा परिणाम ईशान्य भारतावर होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. मुंबईनंतर आता मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात याचा परिणाम जाणवणार असल्याचं देखील बोललं जात आहे.
ताज्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि त्यामुळे आठवडाभर महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या प्रभावामुळे गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाची अपेक्षा आहे .याच वाऱ्यामुळे पुढील 6-7 दिवसांत पश्चिम किनाऱ्यावर (केरळ, कर्नाटक, किनारपट्टीच्या महाराष्ट्र आणि गोवा) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> मान्सून मुंबईत दाखल, नेहमीपेक्षा तब्बल 12 दिवस लवकर, हवामान खात्याने काय म्हटलं?
27-30 मे आणि कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रे, कर्नाटकातील किनारी आणि घाट क्षेत्रात पाऊस कोसळणार आहे. काही तज्ञांच्या मते, अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने समुद्र खवळलेला राहील. मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सुरक्षा उपाय: वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडण्याची किंवा पाणी साचण्याची शक्यता आहे.