वाघांच्या हल्ल्यांची मालिका सुरूच! चंद्रपुरात एकाच दिवसात दोघांना संपवलं, या महिन्यात 11 दगावले

मुंबई तक

यापूर्वी 11 मे रोजी सिंदेवाही तालुक्यात तेंदू पत्ते गोळा करणाऱ्या तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या महिन्यात अशा अनेक घटना घडल्या असून, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चंद्रपूरमध्ये वाघांच्या हल्ल्यांची मालिका सुरूच

point

वाघाच्या हल्ल्यात काल एकाच दिवसात दोघांचा मृत्यू

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांमुळे चांगलीच दहशत पसरली आहे. मंगळवारी चिचपल्ली वन परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यासह मे महिन्यात वाघांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे.

हे ही वाचा >> आजचं हवामान: मुंबईत मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी..

सकाळच्या वेळी चिरोली गावातील 45 वर्षीय नंदा संजय मकालवार आपले पती आणि काही लोकांसह बांबूच्या लाकडांसाठी जंगलात गेल्या होत्या. चिचपल्ली रेंजमधील कंपार्टमेंट क्रमांक 524 मध्ये वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

त्याच दिवशी दुपारी याच परिसरात कंतापेठ येथील 52 वर्षीय सुरेश सोपणकर मवेशी चरायला जंगलात गेले असता, वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचाही मृत्यू झाला.

एकाच महिन्यात 11 जणांचा मृत्यू 

यापूर्वी 11 मे रोजी सिंदेवाही तालुक्यात तेंदू पत्ते गोळा करणाऱ्या तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या महिन्यात अशा अनेक घटना घडल्या असून, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.

हे ही वाचा >> एक्सप्रेस वेवरील अश्लील Video.. नेत्याने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं!

वन विभागाकडून सतर्कता

वाढत्या हल्ल्यांमुळे वन विभागाने सतर्कता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिकांना जंगलात जाण्यापूर्वी खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp