अशोक सराफ यांना पद्मश्री, महाराष्ट्रातील आणखी कोणत्या दिग्गजांचा सन्मान? वाचा यादी
Padma Shri Award: मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि प्रसिद्ध सुलेखक अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
ADVERTISEMENT

Padma Shri Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील 68 मान्यवरांना प्रतिष्ठित पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांचे पुत्र उन्मेष जोशी यांनी स्वीकारला.
हे ही वाचा >> वाघांच्या हल्ल्यांची मालिका सुरूच! चंद्रपुरात एकाच दिवसात दोघांना संपवलं, या महिन्यात 11 दगावले
महाराष्ट्रातील कुणाकुणाचा सन्मान?
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि प्रसिद्ध सुलेखक अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. याशिवाय, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे, डॉ. विलास डांगरे, सुभाष शर्मा आणि चेतन चिटणीस यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हे ही वाचा >> एक्सप्रेस वेवरील अश्लील Video.. नेत्याने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं!
दरम्यान, या पुरस्कार सोहळ्याने देशभरातील कला, संस्कृती, सामाजिक कार्य आणि विज्ञान क्षेत्रातील योगदानाला मानवंदना देण्यात आली. तसेच, भारताचे माजी सरन्यायाधीश जगदीश सिंह खेहर यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.