6 जूनला राज्याभिषेक करण्याची पद्धत नामशेष केली पाहिजे... संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी 6 जूनपूर्वी हटवण्याची मागणी काही संघटनांनी केली आहे. यावर प्रश्न उपस्थित केले असता, त्यावर संभाजी भिडे बोलत होते.
ADVERTISEMENT

Sambhaji Bhide : 6 जून रोजी साजरा केला जाणारा शिवराज्याभिषेक सोहळा रद्द करण्याची मागणी शिवप्रतिष्ठाणचे संभाजी भिडे यांनी केली आहे. 6 जूनला हा सोहळा साजरा न करता, तिथीनुसार साजरा करावा असं मत त्यांनी मांडलं आहे. यावरुन आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे ही वाचा >> भाच्यावर जडला जीव, 43 वर्षांच्या मामी 22 वर्षाच्या भाच्यासोबत गेली पळून, एवढंच नाहीतर...
राज्याभिषेक सोहळ्याबद्दल काय म्हणाले भिडे?
6 जूनला राज्याभिषेक करण्याची पद्धत नामशेष केली पाहिजे. 76 वर्षे झाली, मात्र अजूनही मानसिक अधिष्टान ब्रिटीशांच्या स्वाधीन ठेवलंय असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी 6 जूनपूर्वी हटवण्याची मागणी काही संघटनांनी केली आहे. यावर प्रश्न उपस्थित केले असता, त्यावर संभाजी भिडे बोलत होते. "वाघ्या कुत्रा काढता कामा नये, तो राजकारणाचा विषय करता कामा नये. तसंच राज्याभिषेक सोहळा हा तिथीनुसार झाला होता, त्यामुळे तो तिथीनुसारच साजरा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे."
"वाघ्या कुत्रा काढता कामानये"
संभाजी भिडे यांना यावेळी इतिहास संशोधकांच्या संदर्भाने पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. यावेळी इतिहास संशोधकांची काय उंची आहे? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. तसंच या कुत्र्याबद्दल एखादं संशोधन मंडळ स्थापन करुन त्यामाध्यमातून संशोधन करुन तो निर्णय करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
हे ही वाचा >> बीड पुन्हा हादरलं! पवनचक्की परिसरात चोरट्यांवर गोळीबार, एक ठार, घटना काय?
दरम्यान, यावेळी संभाजी भिडे यांनी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावरही आपली प्रतिक्रिया दिली. वैष्णवी हगवणे प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, हुंडा मागणं देशाला कलंक आहे. हुंड्याची ही पद्धत सर्व बळ वापरून नामशेष केली पाहिजे. पण ते करत असताना राजकारण करता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे असं भिडे म्हणाले.