चेहरा भोळा अन्... ज्योती मल्होत्राने कबूल केलं 'ते' सत्य, हादरवून टाकणारी कहाणी!
Jyoti Malhotra News: ज्योती मल्होत्राने पाकिस्तानशी असलेले तिचे खास कनेक्शन अखेर कबूल केलं आहे. ज्याबाबत आता तिने नेमकी माहिती तपास यंत्रणांना दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ज्योती मल्होत्राने कबूल केले की तिचे पाकिस्तानशी संबंध आहेत
चौकशीदरम्यान ज्योतीची खरी कहाणी समोर आली
Jyoti Malhotra: नवी दिल्ली: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली हरियाणाची ज्योती मल्होत्रा पोलिसांच्या ताब्यात आहे (Youtuber Jyoti Malhotra). आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्राची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत, ज्योतीची स्थानिक हरियाणा पोलीस, IB, NIA आणि गुप्तचर यंत्रणेच्या पथकांनी चौकशी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान ज्योतीने जे सांगितले त्यावरून हे स्पष्ट होते की, तिचे पाकिस्तानशी खास कनेक्शन होते. तसेच ती पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होती. ज्योती ही पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिश याच्याशी सतत संपर्कात होती हे देखील समोर आले आहे.
ज्योती मल्होत्राची कबुली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान ज्योतीने जी कबुली दिली आहे त्यामुळे ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होती या संशयाला बळकटी मिळते. ज्योतीने तिच्या कबुलीजबाबात म्हटले..
"माझ्याकडे 'ट्रॅव्हल विथ जो' नावाचे एक यूट्यूब चॅनल आहे. माझ्याकडे पासपोर्ट आहे. माझा पासपोर्ट नंबर 5609** आहे आणि मी 2023 मध्ये पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसा मिळवण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेले होते. तिथे माझी भेट अहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली.
मी दानिशचा मोबाईल नंबर 981******* घेतला आणि त्यानंतर मी दानिशशी बोलू लागले. त्यानंतर मी दोनदा पाकिस्तानला गेले जिथे मी दानिशच्या विनंतीवरून त्याच्या ओळखीच्या अली हसन याला भेटले. तिथे अली हसनने माझ्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली.
पाकिस्तानात, अली हसनने माझी पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी भेट घडवून आणली आणि तिथे मी शकीर आणि राणा शाहबाज यांनाही भेटले. मी शकीरचा मोबाइल नंबर ** घेतला मी त्याचा नंबर माझ्या मोबाइलमध्ये "जाट रधांवा" नावाने सेव्ह केला. जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. दरम्यान, मी भारतात परत आले. यानंतर मी व्हॉट्सअॅप, स्नॅप चॅट आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर सुरू केला. मी मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सतत सर्वांशी संपर्कात होते."
ज्योती पाच दिवसांपासून पोलीस कोठडीत
ज्योती मल्होत्राला पाच दिवसांपूर्वी पाकिस्तानातून हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि सध्या ती पोलीस कोठडीत आहे. यावेळी वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी ज्योतीला प्रश्न विचारले. ज्योतीच्या वारंवार पाकिस्तान भेटी आणि पाकिस्तान उच्चायुक्तालयात थेट प्रवेश यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हे ही वाचा>> प्रोटोकॉल, अंडरकव्हर एजंटसारखे शब्द... ज्योती मल्होत्राच्या चॅटमधून मोठा गौप्यस्फोट?
सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, यातून पाकिस्तानला कोणता उद्देश साध्य करायचा होता? सूत्रांच्या माहितीनुसार, तपास संस्थांना या कारवायामागे दोन मुख्य हेतू असल्याचा संशय आहे.










