प्रोटोकॉल, अंडरकव्हर एजंटसारखे शब्द... ज्योती मल्होत्राच्या चॅटमधून मोठा गौप्यस्फोट?
Jyoti Malhotra : हरियणातील हिसार येथील वास्तव्यास असणारी ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणात चांगलीच वादाच्या कचाट्यात सापडली आहे. पाकिस्तानच्या एका संघटनेसाठी तिने हेरगिरी केल्याचा आरोप ज्योतीवर आहे. अशातच आयएसआयचे अधिकारी आणि ज्योतीचे काही चॅट समोर आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हरियाणातील हिसार येथील वास्तव्यास असणारी ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणात चांगलीच वादाच्या कचाट्यात सापडली आहे.

पाकिस्तानच्या एका संघटनेसाठी तिने हेरगिरी केल्याचा आरोप ज्योतीवर आहे.
Jyoti Malhotra : हरियाणातील हिसार येथील वास्तव्यास असणारी ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणात चांगलीच वादाच्या कचाट्यात सापडली आहे. पाकिस्तानच्या एका संघटनेसाठी तिने हेरगिरी केल्याचा आरोप तिच्यावर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ISI भारतीय गुप्तहेरांची ओळख पटवण्यासाठी ज्योतीला हेरगिरी करण्यास सांगितलं असल्याचं बोललं जात आहे. अशातच तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुप्तचर विभाग आणि हरियाणा पोnrm संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा : स्वतःचे Video पॉर्न साइटवर अपलोड करणाऱ्या डॉक्टरची खरी कहाणी आली समोर!
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, तपास यंत्रणांना ज्योती आणि आयएसआयचा संशयित हँडलर अली हसन यांच्यातील व्हॅट्सअॅप चॅट सामोर आलं. या चॅटमध्ये प्रोटोकॉल आणि अंडरकव्हरसारख्या शब्दांचा अधिक वापर करण्यात आला होता. चॅटमध्ये अलीने विचारले की, तुम्ही अटारी सीमेवर असताना कोणाला प्रोटोकॉल मिळाला होता? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर ज्योतीने उत्तर देताना सांगितलं की, मला समजलं नाही, त्यानंतर ती पुढे म्हणाली की, ते एवढेही मूर्ख नाहीत. अशा चॅटमुळे एजन्सीचा ज्योतीवर अधिक संशय बळावला गेला.
मिळवलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला गेली होती. दरम्यान, दावा करण्यात आला की, त्यांचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते. तपासानंतर असे समोर आले की, तिचे पाकिस्तानचे अधिकारी दानिशशी बोलणं झालं होतं. यानंतर दानिशला 13 मे पासून भारत सरकारने पर्सोना नॉन ग्राटा घोषित केलं.
चौकशीदरम्यान ज्योतीचा तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ज्योतीचा संपर्क कसा झाला? असा विचारलं असता, आपल्याला यातील काहीही माहिती नसल्याचं सांगत होती. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती सविस्तरपणे कसलीही माहिती देत नाही. ज्योती खरं सांगण्यापासून काहीतरी लपवत असल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा : ज्योती मल्होत्राचा कबुलीनामा! पाकिस्तानात कधी, कुठे आणि काय केलं... यंत्रणांना मिळाली महत्वाची माहिती
दरम्यान, पहलगाम हल्ला झाल्यानंतर ज्योतीने सुरक्षा दलावर भाष्य केलं होतं. तिने एका व्हिडिओत सरकारला धारेवर धरलं आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात सुरक्षादलाची चूक आहे. सरकार यावर पाऊल उचलत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादल असूनही हा हल्ला झाला कसा? असा प्रश्न तिने उपस्थित केला. तिने सुरक्षादलावर प्रश्न उपस्थित केल्याने तिच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.